पुणे- गोरगरीबांसाठी राबविलेल्या सामाजिक उपक्रमांमुळेच राज्यात पुण्यासह अनेक महापालिकांवर भाजपची सत्ता आहे . पुण्यातील नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी गरिबांसाठी राबविलेले उपक्रम आदर्शवत आहेत त्यांच्याप्रमाणे इतरांनीही उपक्रम राबविले पाहिजेत असे उदगार येथे केंदीय अन्नधान्य आणि ग्राहक संरक्षण राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले .नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आयोजित केलेल्या दिवाळी सरंजाम वाटप आणि ऑनलाईन भव्य नौकरी महोत्सवाचे उद्घाटन आज मंत्री दानवे तसेच खासदार गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आ. भीमराव तापकीर , भाजयुमोचे अध्यक्ष बाप्पू मानकर आणि या भागातील नगरसेवक आदी भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दानवे यावेळी म्हणाले कि , कोरोनाच्या महामारीच्या काळात गरीब हैराण झालेला असल्ये त्याच्या मदतीला धाऊन जाणे भाजप कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे तो ते पार पाडीत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी वेळीच लॉक डाऊन चा निर्णय घेऊन आणि गरिबांसाठी मोठ्या मदतीची कवाडे खुली करून जनतेला दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री यांच्या प्रमाणेच नगरसेवक हि गरिबांसाठी उपक्रम राबवीत आहेत . वेडेपाटील यांचे कार्य त्या अनुषंगाने कौतुकास्पद आहे त्यांच्याप्रमाणे अन्य नगरसेवकांनी देखील कार्य सुरु केले आहे. खा. बापट ,आ .तापकीर यांची यावेळी भाषणे झाली . प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी दिवाळी सरंजाम वाटप करून ६००० कुटुंबासाठी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आणि ऑनलाईन नौकरी महोत्सवाचा हि प्रारंभ करण्यात आला .आपल्या प्रास्ताविकात वेडेपाटील यांनी खा. बापट आणि आ. तापकीर तसेच महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे करत असताना त्यांच्याच नेतृतावाखाली आणि प्रेरणेने केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल नमूद केला. पहा या कार्यक्रमाची व्हिडीओ झलक …

