Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंडे-खडसेंचा पत्ता कापला, भाजपत पुन्हा आयारामांना संधी

Date:

 

मुंबई-२१ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले एकनाथ खडसे आणि परळीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा निष्ठावंतांना संधी नाकारत पक्षात नवीन आलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे ४ उमेदवार असणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून या चार उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं असून तशी यादीही जाहीर करण्यात आलेली आहे.

संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्याने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल. भाजपने तर तसे संकेत आधीच दिले आहेत. नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मते आहेत.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मते कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्याने ही मते मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असे भाजपचे नेते ठामपणे दावा करतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सहा उमेदवार निवडून आणण्याकरिता १७४ मते लागतील. विश्वासदर्शक ठरावावर १६९ मते मिळाली होती. परिणामी महाविकास आघाडीने जोर लावल्यास सहावी जागा निवडून आणणे शक्य आहे. पण त्यासाठी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. मुख्यमंत्री किंवा एखादा वरिष्ठ नेता राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात असतो तेव्हा धोका पत्करला जात नाही. तेव्हा शक्यतो निवडणूक बिनविरोधच होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, अशीच चिन्हे आहेत.

‘सत्ताधाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी असल्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपला चार जागा मिळणार असल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपच्या गोटातून याआधीच सांगण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...

बांग्लादेशी राज्यात आणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या जवळचे ड्रग्सचे कारखाने चालवत आहेत.

ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी...