पुणे :
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहिदांना नमन करण्यासाठी पुणे ते राजगुरूनगर रॅली भाजप तर्फे आयोजित करण्यात आली होती . पुण्यापासून शहीद राजगुरू यांच्या जन्मस्थळी राजगुरूनगर पर्यंत आयोजित या रॅलीचे नेतृत्व भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य उषा वाजपेयी यांनी केले .
या रॅलीमध्ये ‘आजादी के 70 साल- याद करो कुर्बानी’ असा संदेश देणारा चित्र रथ राजगुरूनगर येथे नेण्यात आला. रॅलीमध्ये रथाबरोबर 12 गाड्यांमधून 60 कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.
राजगुरूनगर येथील शहीद राजगुरू यांच्या जन्मस्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती सदस्य ,ज्येष्ठ नागरिक ,विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली . महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता

