पुणे- भारतीय जनता पार्टी राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्याने या पक्षाचे आकर्षण अनेकांना वाटू लागले आहे.भाजप आता महापालिकेत हि सत्ता मिळवेल या शक्यतेने अनेक जण भाजपमध्ये गेले . महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची गर्दीही भाजपाकडेच आहे. आज पासून इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्या खऱ्या .. पण प्रत्येक २ तासांनी मुलाखतीत कॉंग्रेसचेच चेहरे दिसत होते … त्यातल्या त्यात स्थायी समितीचे अध्यक्ष पद ज्यांनी राष्ट्रवादी त असताना मिळविले ते नगरसेवक कर्णे गुरुजी आणि काँग्रेसमध्ये असताना उपमहापौर पद मिळविलेले प्रसन्न जगताप यांच्या आज मुलाखती झाल्या .
पालकमंत्री गिरीश बापट , शहर अध्यक्ष योगेश गोगावले,खासदार अनिल शिरोळे ,खासदार संजय काकडे,राज्यमंत्री दिलीप कांबळे ,आमदार माधुरी मिसाळ,बाबा मिसाळ,आमदार विजय काळे,जगदीश मुळीक तसेच उज्वल केसकर, गणेश बिडकर ,शशिकला मेंगडे आदी मान्यवरांनी या मुलाखती घेतल्या .
दरम्यान आज मुलाखतीच्या पहिल्याच दिवशी ..माय मराठी डॉट नेट ने भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते ,नगरसेवक आणि सध्या आमदार असलेले नेते विजय काळे यांच्याशी साधलेला हा संवाद …