पुणे- इथे सोनी टीव्ही वरील कपिल शर्माच्या शो मधील अण्णा हजारे यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ दिला आहे… ,’मै अगर इलेक्शन मे खडा रहूंगा तो मेरा तो डीपौझीट भी जप्त हो जायेगा .. हे वाक्य आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे .. जिथे अण्णांच्या सारख्या अत्यंत प्रामाणिक आणि संत व्यक्तीला इथल्या निवडणुकीबद्दल एवढा विश्वास आहे ,तिथे आणखी कोणते राजकारण शिजत असणार ? सर्वांना ठावूक आहे ..इथे ‘सबसे बडा खिलाडी ‘ च लागतो … म्हणजे काय, साम, दाम दंड ,भेद, या सर्वांचा आवश्यक तिथे तेवढा वापर करूनच आजकालचे राजकारण आणि निवडणुका चालत आहेत .
एकीकडे महारष्ट्रात अनेक गुन्हे घडत आहेत त्यांचे सामाजिक-राजकीय सर्व प्रकारचे पडसाद जोरदारपणे उमटत आहेत ,मोर्चेच मोर्चे निघत आहेत ..मुख्यमंत्र्यांना चैनेची झोप लागणार नाही असे वातावरण आहे . भुजबळ आत आहेत , दादांचे प्रकरण बाहेर आहे , अशात महापालिकांच्या निवडणुकांचे ढोल वाजू लागले आहेत . लोकसभा , विधानसभा तर झाल्या,आता महापालिकांची बारी आहे , अशांत महाराष्ट्राच्या वातावरणातही मुख्यमंत्री पदावर टिकून आहेत पण निवडणुकांमध्ये जर भाजपला अपयश मिळाले ,तर मात्र सांगता येत नाही, त्याचे खापर नक्कीच मुख्यमंत्र्यांवरच फोडले जाणार . यशाची फळे चाखायला सारे येतात .पण अपयश मात्र त्यांच्याच माथी मारले जाईल असे कदाचित वाटल्याने, आणि जातीय राजकारणाला -राजकीय चाणक्यनीतीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच जणू काही..पुण्याचा ‘सबसे बडा खिलाडी ‘ निवडला असावा.. असे अनेकांना वाटते आहे . आणि .. त्याच स्टाइलने … ‘शक्तिशाली’ कार्यकर्ते प्रवेशासाठी दाखल होवू लागले असावेत .
पुण्याच्या राजकारणात हे असे चित्र काही पहिल्यांदा नाही .यापूर्वीही असे वारंवार घडले आहे . पण गुन्हेगारांना प्रवेश … पक्षाची संस्कृती , परंपरा या नावाने ओरडदेखील नेहमीप्रमाणे सुरु झाली आहे . अर्थात हि ओरड चुकीची अजिबात नाही , योग्य असली तरीही त्याद्वारे देखील एक प्रकारचे ‘गुन्हेगारी’चे हि मार्केटिंग होत असल्याचे देखील कोणी नाकारू शकणार नाही . जे गुंड ज्यांना माहिती नव्हते , जेवढे मोठे नव्हते, तेवढे कदाचित, ते या मार्केटिंग ने मोठे मानले जाण्याची भीती आहेच . आणि निवडणुकीपूर्वी वेगळे वातावरण .. निर्माण होवू पहातेआहे . एक तर त्याचा भाजपला फायदा होईल किंवा तोटा होईल.
पण अण्णा हजारे यांचे हे विधान जर ऐकले आणि ते याबाबत विचाराधीन घेतले तर … किंवा गतकाळातील कलमाडींची कारकीर्द कशी बहरली गेली होती याची माहिती घेतली तर .. अनेकांची मते.. भाजपला या वातावरणाचा फायदा होईल अशी येवू शकतील . कारण कलमाडींच्या काळातही गुन्हेगारांना प्रवेश ..आणि पदे वाटपाबाबत अशी मोठ्ठी ओरड झाली होती .पण सत्ताधीश तेच राहिले होते .
पण असे असतानाही , आता पुण्यातले आमदार … प्रत्येक विधानसभा मतदार संघात कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही हे आम्हाला विचारल्याशिवाय थेट मुख्यमंत्र्यांनी घेवू नये असे म्हणत आहेत . अर्थात त्यांचेही बरोबर आहे . पण त्याबरोबर आपापल्या मतदार संघात हे आमदार भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आणण्यासाठी किती ‘मेहनत’ ‘खिलाडी’वृत्तीने घेणार आहेत ? हा प्रश्न आहेच . अर्थात निवडणुका जिंकायला काय करावे लागते हे त्यांना ठावूक आहेच. काँग्रेस विरोधातील मोदींचा नियोजनबद्ध प्रचार यामुळे निर्माण झालेल्या मोदीलाटेत.. पुण्यातले सर्वच आमदार विराजमान तर झाले . पण आता तेच आमदार आपापल्या विधानसभा मतदार संघात भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आणण्यासाठी कोणते धनुष्य उचलणार आहेत ? हे येणारा काळच सांगू शकणार आहे .
पुण्यातल्या आमदारांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान ?
Date: