काँग्रेसने पुण्यात डिपॉजिट वाचवावे – संजय काकडे

Date:

पुणे-
पुणे लोकसभा मतदार संघात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार गिरीश बापट तीन ते साडेतीन लाख मताधिक्याने निवडून येतील असं वाटत होतं परंतु, काँग्रेसचा उमेदवार पाहता पुण्यातील लढत एकतर्फी होईल. काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉजिट जप्त होईल आणि गिरीश बापट पाच लाखांंहून अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा अंदाज खासदार संजय काकडे यांनी  सांगितले.महाराष्ट्रातील 48 पैकी 46 जागांवरील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आजच विजयी झाले आहेत. बारामती व नांदेड लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेऊ आणि मतदानाच्या दिवसापर्यंत या दोन्ही जागाही महायुतीच्या उमेदवारांसाठी सकारात्मक करुन तिथेही महायुतीचाच उमेदवार निवडून आणू. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेत जातील आणि बारामतीत सुप्रिया सुळे एक लाख मतांनी पराभूत होतील. महाराष्ट्रात यावेळी नक्की इतिहास घडेल, असा आत्मविश्वास पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केला.

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार काकडे यांना पत्रकारांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न केल्यानंतर खासदार काकडे यांनी हा अंदाज व्यक्त केला.

देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व 48 लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी उत्तम पद्धतीने प्रचार मोहिम राबविली आहे. यामुळेच महायुतीला यश मिळणार असून पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागांपैकी नऊ जागांवर आताच महायुतीचा विजय झाला आहे. तर, 22 एप्रिलपर्यंत बारामतीची जागाही महायुतीच्या उमेदवारासाठी सकारात्मक होईल व कांचन कुल सुप्रिया सुळे यांना एक लाख मताधिक्याने पराभूत करतील.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी खासदार संजय काकडे यांची कार्यकर्त्यांसोबत दुचाकी रॅलीबरोबर ‘ग्रँड एंट्री’ झाली. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितदादांचा भाजप प्रवेश?
महसूल मंत्री चंद्रकांत दादांचा उल्लेख दादा असा करताना खासदार संजय काकडे यांनी पुण्यातल्या दादांची आठवण सभेत बोलताना केली. सभेत बोलताना खासदार काकडे म्हणाले की, पुण्यातही एक दादा आहेत व तेदेखील लवकरच आपल्या व्यासपीठावर दिसतील, असे सांगताच भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंग मध्ये अजित दादांचंही नाव आहे की काय? अशी चर्चा खासदार काकडे यांच्या भाषणानंतर उपस्थितांमध्ये रंगली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...