विकासकामांवर चर्चा करण्याचे कॉंग्रेस ला आव्हान-आमदार विजय काळे

Date:

पुणे-
गेल्या पन्नास वर्षांत कॉंग‘ेस पक्षाच्या नाकर्तेपणा मुळे पुणे शहराच्या विकासाचा खेळखंडोबा झाला. युती सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या काळातचे शहराच्या विकासाला गती मिळाली. शहराच्या विकासकामांवर चर्चा करण्यास कॉंग‘ेस धजावत नाही. त्यामुळे वैयक्तिक चारित्र्यहनन करणारे बिनबुडाचे आरोप केले जातात. कॉंग‘ेसने विकासकामांवर जाहीर चर्चा करावी, आम्ही त्यासाठी तयार आहोत असे आव्हान आमदार विजय काळे यांनी दिले.
महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आज झालेल्या पत्रकार परिषद आमदार काळे बोलत होते. शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत बधे, प्रचार प्रमुख राजेंद्र शिंदे, आरपीआयचे प्रचार प्रमुख ऍड मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार काळे म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे कॉंग‘ेस पक्षाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. परंतु पुण्याच्या विकासाकडे कॉंगेसने कायमच दुर्लक्ष केले. कॉंग‘ेस राष्ट्रवादीतील सत्ता संघर्ष आणि श्रेयवादाच्या लढाईत पुण्याच्या विकासाला खीळ बसली. युती सरकारच्या पाच वर्षांच्या राजवटीत जेवढी आर्थिक तरतूद पुण्यासाठी केली तेवढी कॉंग‘ेसच्या चाळीस वर्षांत झाली नाही. पुणकरांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहराचा नियोजनबद्ध विकासाचा कार्यक‘म आम्ही हाती घेतला आहे. मेट्रो, रिंगरोड, पीएमआरडीए, एचसीएमटीआर, समान पाणीपुरवठा, नदी सुधार योजना, नदीकाठ संवर्धन, पंतप्रधान आवास योजना, विद्युत महामंडळाचे सक्षमीकरण असे अनेक विकासाचे कार्यक‘म आम्ही हाती घेतले आहेत. त्यामुळे कॉंग‘ेस पक्षाने हवेत आरोप न करता विकासकामांवर चर्चा करावी आम्ही त्यासाठी कधीही तयार आहोत असे जाहीर आव्हान मी देतो.’
आमदार काळे पुढे म्हणाले, ‘गेल्या साडेचार वर्षांत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग, विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल, विद्यापीठ व जुन्या पुणे मुंबई रस्त्याचे रूंदीकरण, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी राज्य शासनाचा विकास निधी, पाटील इस्टेट झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन, पोलीसांचा घरांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल असा विश्‍वास वाटतो.’
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“युवा पिढी सक्षम; बदलत्या भाषेला स्वीकारा पण माणुसकी व समानतेची शिदोरी जपा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

"शब्दांमधून विचार, विचारांमधून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते; युवकांनी...

पुणे महापालिकेचे 52 अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त

पुणे- फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 52 अधिकारी आणि कर्मचारी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून २६ जण सेवानिवृत्त..

पिंपरी, (दि. १ मार्च २०२६) :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे...