पुणे- भाजपचे खासदार संजय काकडे यांनीही पुण्यात भाजपला एकहाती सत्ता मिळेल, असा दावा करून पुण्यात एकहाती सत्ता मिळाली नाही तर, सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.
अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी मतदान झाले आहे. पुण्यात भाजपला ७७ ते ८५ जागा मिळतील आणि हा पक्ष सर्वात मोठा ठरेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ६० ते ६६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेला १० ते १३ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मागील निवडणुकीत मुसंडी मारलेल्या मनसेला तीन ते सहा जागा मिळतील, तर इतरांना केवळ १ ते ३ जागा मिळतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.