पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज प्रभाग क्रमांक १७ (रास्ता पेठ- रविवार पेठ ) येथे भेट दिली. या भेटीदरम्यान येथील अपक्ष उमेदवार मनिष साळुंके यांनी यावेळी भाजपला जाहीर पाठिंबा दिला. पालकमंत्री बापट यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भाजपलाच पसंती दर्शविली.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक १७ येथील उमेदवार रोहिणी नाईक, उमेश चव्हाण, अरविंद कोठारी आणि सुलोचना कोंढरे यांच्याशी पालकमंत्री बापट यांनी चर्चा केली तसेच मतदारांच्या गाठी भेटी घेऊन संवादही साधला.
“काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसने ‘भकास’ केलेल्या पुणे शहराला आता ‘विकास’ हवा आहे. यासाठी परिवर्तन होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षात हे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असल्याने मी पाठिंबा देत असल्याचे साळुंके यांनी यावेळी सांगितले. उमदेवार मनिष साळुंके हे भाजपमधील इच्छुक उमेदवार होते. परंतु, समानव्याअभावी त्यांचा अर्ज मागे पडला. परंतु, आज पालकमंत्री बापट यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर साळुंके यांनी ड वर्गातून रिंगणात असलेले भाजपचे अधिकृत उमेदवार अरविंद कोठारी यांना आपला पाठिंबा देत पुन्हा सक्रियतेने काम सुरु केले.
दरम्यान, मनसे नगरसेविका अनिता डाखवे, राकेश डाखवे यांच्यासह विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. भाजपच्या विकास कामामुळे प्रभावित होऊन पक्षप्रवेश केला असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
भैया डाखवे, युवराज रुके, शैलेश पिंपळे, देवेंद्र उर्फ छोटू वडके, ओंकार वडके, विजय ठाकर, बाबू पोरे, सुधीर डाखवे, जयश्री कांबळे (प्रभाग 16 अपक्ष, काँग्रेस कार्यकर्ता), रंजना सुभाष जाधव (प्रभाग 16 संभाजी ब्रिगेड सरचिटणीस), स्मिता पवार ( काँटोमेन्ट महिला आघाडी सेक्रेटरी), सुशील पवार, कुमार गायकवाड, चंदू इनामदार, ओंकार पोटफोडे, मिलिंद तिकाने, मंदार पाटील, राकेश सोरटे, सुरज मुढे, सागर पिंपळे, विकी कांबळे (काँग्रेस कार्यकर्ता) आरती कोंढरे, सम्राट थोरात, विजयालक्ष्मी हरिहर,अजय आप्पासाहेब खेडेकर, उमेश गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
………………………………………………….

