भाजपच्या ‘माझं पुणं स्मार्ट पुणं ग्वाही’ या जाहीरनाम्याचे आज (शुक्रवारी) पुण्यात प्रकाशन करण्यात आले. यामध्ये त्यांनी अमृत आवास योजने अंतर्गत पुढील 5 वर्षात 50 हजार घरे उभारण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.
या जाहीर नाम्याची ठळक वैशिष्ठ्ये
महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या ठिकाणी वेळेत शहरातील 50 मार्गावर महिला, कामगार आणि दुर्बल घटकांसाठी मोफत पीएमपी सेवा देणार
अमृत आवास योजने अंतर्गत पुढील 5 वर्षात 50 हजार घरे उभारणार
सार्वजनिक वाहतुक आधिक सक्षम करणार.
24 तास समान पाणी पुरवठा करण्यात येणार
पाण्याची गळती रोखण्यासाठी सर्वकष आराखडा तयार करणार
राज्य शासनाकडून पाण्याचा कोटा वाढून घेणार
मुळा मुठा नदी सुंदर करण्यासाठी विविध उपाय योजना राबविणार
गृह खात्याच्या मदतीने झोपडपट्टी दादांवर कठोर कारवाई करणार
राज्य शासनाच्या मदतीने पुणे शहरात जलशिवार योजना राबविणार
सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबविणार
महापालिकेच्या अमेनिटी स्पेसेसची यादी प्रसिध्द करणार
प्रत्येक प्रभागात 1 ते 2 टन क्षमतेचे ओला कचरा प्रकल्प सुरु करणार
स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारणार
एका महिन्याच्या पासमध्ये दुस-या महिन्याचा पास दिला जाणार
विद्यार्थाच्या सुरक्षित प्रवासासाठी विशेष योजना