शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने भाजपच्या प्रचाराची सोमवारी मुहूर्तमेढ सिंहगडावर प्रदेशाध्यक्ष देणार सुराज्याची शपथ
पुणे, : किल्ले सिंहगडावर शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टी पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुराज्याची मुहूर्तमेढ करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी कळविली आहे.
पारदर्शक, गतीमान, भ‘ष्टाचारमुक्त, विकासाभिमुख, सुशासनासाठी कटिबध्द होण्याची शपथ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपच्या उमेदवारांना देणार आहेत. सोमवारी ता. ६ ङ्गेब‘ुवारी सकाळी आठ वाजता सिंहगडावरील पुणे दरवाजा एक येथे हा कार्यक‘म होणार आहे.
या निमित्त सकाळी सात वाजता सिंहगडावरील कोंडाणेश्वर व अमृतेश्वर मंदिरात महाअभिषेक करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि राजाराम महाराजांच्या समाधीचे पूजन करण्यात येणार आहे.
शिवछत्रपतींच्या जयजयकारात आणि सनई, चौघडा व तुतारीच्या निनादात गडावर भालदार चोपदारांच्या उपस्थितीत हा मंगलमय शपथ सोहळा होणार आहे. सिंहगडावरील चारही दरवाजांना सुराज्याचे तोरण लावण्यात येणार आहे.
पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.