मुंबई-मुंबईतील हौऊसिंग फेडरेशनच्यावतीने मुंबईतील गृहनिर्माण संस्थामधील प्रश्न आज सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासमोर मांडले. गृहनिर्माण संस्थाचे अनेक छोटे मोठे विषय असून त्यामध्ये गृहनिर्माण सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स आणि इमारतीचे स्वयं पुनर्विकास हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील सहकारी संस्थाचे प्रश्न व अडचणी या समजून घेण्यासाठी सरकारने एक टास्क फोर्स नेमावा अशी मागणी भाजपचे नेते व आमदार प्रविण दरेकर यांनी केली. त्याचवेळी सहकारी संस्था आणि गृहनिर्माण सोसायटीचे प्रश्न लवकर सकारात्मकरीत्या सोडविणार अशी ग्वाही सहकार मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली.
प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात भाजप नेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन तसेच मुंबईच्या सहकार विभागातर्फे फेडरेशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सहकारमंत्री अतुल सावेजी यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. या शिबिरात सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील तंटामुक्ती, गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीचे अभिहस्तांतरण, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकास आदीं विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सहकार सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे ,मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे सचिव डी एस वढेर खजिनदार डी एन महाजन , वर्ग मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, विठ्ठल भोसले, नितीन बनकर, अनिल गजरे,महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण सहकारी महासंघाचे अध्यक्ष सिताराम राणे, उपाध्यक्ष सुहास पटवर्धन त्याचबरोबर सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे,मुंबई जिल्हा 1निबंधक जे डी पाटील, जिल्हा निबंध मुंबई 2 प्रताप पाटील, संचालक वर्ग 3 निबंधक राजेंद्र वीर, जिल्हा उपनिबंधक मुंबई 4 कैलास झेबले तसेच मुंबई विभागातील सर्व उपनिबंधक सहाय्यक निबंध सहकारी संस्था आदी उपस्थित होते. तसेच शहरातील गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारीही हजर होते.
सहकार मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित गृहनिर्माण संस्थाचे प्रश्न ऐकून घेतले व ते सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून त्यादृष्टीने एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल.तसेच डीम्ड कन्व्हेयन्स अधिक सुलभ व जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच इमारतीचे स्वयं पुनर्विकास हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबत आमचे सरकार अनुकूल आहे. ही योजना पुन्हा कार्यान्वित झाली तर मुंबईतील लाखो रहिवाशांच्या हक्काचे व नवीन घरांचे प्रश्न सुटणार आहे, त्यामुळे या योजनेतील अडथळे प्राधान्याने दूर करण्यात येईल असे आश्वासन सहकार मंत्री सावे यांनी यावेळी दिले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर यांनी सांगितले की, मुंबईतील गृहनिर्माण सर्व संस्था चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.आज योगायोग आहे की, आपण आपल्या देशाचा अमृतमहोत्सव साजरा करतोय आणि त्याच वेळी मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन या संस्थेचाही अमृत महोत्सवी वर्ष आहे. आज विविध संस्थाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व निमित्ताने या विषयावर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन व्हावे यासाठी आज या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी दस्तुरखुद्द सहकार मंत्री अतुलजी सावे आणि सहकार सचिव, सहकार आयुक्त उपस्थित आहेत हे आमच्यादृष्टीने खुप महत्त्वाचे आहे.असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी गृहनिर्माण सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत मत व्यक्त केले. प्रकाश दरेकर यांनी आपल्या सहकारी संचालकांच्या सहकार्याने गृहनिर्माण सहकारी चळवळीला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले . सर्व मान्यवरांच्या आदर्श घेऊन आजही फेडरेशन त्या पद्धतीने फेडरेशनचे कामकाज करीत आहे गृहनिर्माण सहकारी संस्थेची महत्त्वाची मानीव अभिहस्तांतरण म्हणजे डिम कन्व्हेन्स , गृहनिर्माण सहकारी संस्थांचा स्वयंपूर्ण विकास गृहनिर्माण सहकारी संस्थांचे संस्थांमध्ये तंटामुक्ती त्याचबरोबर मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनला अधिसूचित नोटिफाईड करण्याबाबत मंत्री महोदय सहकार सचिव सहकार आयुक्त त्यांच्याकडे मागणी केली.