भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी दाखवीला हिरवा झेंडा
मुंबई:- गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष बसेस उपलब्ध करून भाजपचे नेते ,आमदार प्रवीण दरेकर यांनी ४ बसेसला आज कांदिवली येथे हिरवा झेंडा दाखवला. कांदिवली पूर्व येथील जानू पाडा, पांडे कंपाऊंड आणि समता नगर येथून बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून शेकडो भाविक कांदिवली ते सावंतवाडी दरम्यान प्रवास करतील. या पुढाकारामुळे साधारणतः दोनशे भाविक कोकणात प्रवास करू शकणार असल्याने भाविकांनी दरेकर यांचे आभार मानले.
दरेकर म्हणाले, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी अफाट असते. बसेसची आसन संख्या पूर्ण होऊन बस उपलब्ध नसतात. भाविकांना रिझर्वेशन मिळत नाही. ट्रॅव्हलसाठी दाणादाण उडते.या अनुषंगाने कांदिवली पूर्व येथील जानू पाडा, पांडे कंपाऊंड आणि समता नगरमधील बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पुढाकारामुळे साधारणतः दोनशे भाविक कोकणात प्रवास करू शकणार आहेत. गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी कोकणात येतात. गणपती व कोकण वासीयांचे एक अतुट नाते बनले आहे. त्यामुळे गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी बससेवा उपलब्ध करताना आनंद वाटतो, असे दरेकर यांनी सांगितले. शिवसेना आणि भाजपाच्या अधिपत्याखाली साकार झालेल्या सरकारच्या माध्यमातून राज्यातील जनता सुखी होवो, प्रगतीपथावर मार्गक्रमण करो असे विघ्नहर्त्याला साकडे घालत दरेकर यांनी भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपाच्या चित्रपट आघाडीचा उपाध्यक्ष दिशा परुळेकर, भाजपचे वॉर्ड अध्यक्ष लकी यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.