जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेने भाजपच्या बालेकिल्ल्यात झेंडा फडकावला आहे. सांगली पॅटर्न राबवत शिवसेनेने जळगावात भाजपला गडाला सुरुंग लावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. शिवसेनेने 45 मते मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. याची थोड्याच वेळा अधिकृत घोषणा केली जाणार आहे. भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फुटल्याने शिवसेनेला हे यश मिळाले आहे.
महापौर-उपमहापौर पदासाठी आज जळगावात निवडणूक झाली. शिवसेनेच्या जयश्री महाजनांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवले. जयश्री महाजन यांनी प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव केला आहे. जयश्री महाजन यांना 45 मते मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना केवळ 30 मतांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपाचे तब्बल 27 नगरसेवक फुटल्याने यासोबतच एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. यामुळे शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्ते मते मिळवली आहे. महापौरपदी जयश्री महाजन आणि उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.सांगली महागनरपालिकेमध्येही गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता. तर काँग्रेसला महापौर बद मिळाले होते. त्यामुळे आता सांगलीनंतर महाविकासआघाडीने जळगावातही विजय खेचून आणला आहे.

