शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सभागृहनेते बिडकरांनी घेतली झाडाझडती

Date:

पुणे-महानगरपालिकेतील शिक्षणाचे सर्व विषय हे यापुढील काळात शिक्षण समितीसमोर आणावेत, अशा सूचना पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्या. शिक्षण विभागातील अधिकारी यांची कडक शब्दात झाडाझडती घेत बिडकर यांनी कानउघाडणी केली.
शिक्षण विभागाचा कारभार पाहण्यासाठी पालिकेने काही महिन्यांपूर्वी नव्याने शिक्षण समिती तयार केली आहे. या समितीचे कामकाज देखील सुरु झाले आहे. मात्र शिक्षण विभागाकडून अनेक महत्वाचे विषय या समितीकडे आणले जात नाहीत. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सदस्यांना जुमानत नाहीत, अशी तक्रार समितीच्या सदस्यांनी केली होती. तसेच या समितीला आर्थिक अधिकार द्यावेत, अशी आग्रही मागणी सभासदांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते बिडकर यांनी समिती सदस्य व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये शिक्षणाचे विषय समितीसमोर आणलेच पाहिजेत. शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर आता आपल्याला कोणीही विचारणा करणार नाही, असा समज कोणीही करून घेऊ नये. शिक्षणाच्या संदर्भात महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी नियमानुसारच सर्वसाधारण सभेने ही शिक्षण समिती स्थापन करून त्यामध्ये सभासदांची नियुक्ती केली आहे. या समितीकडे दुर्लक्ष करत अधिकारी मनमानी कारभार करत असतील तर यापुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दात बिडकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले.
शिक्षण विभागाचे महत्वाचे विषय हे समिती समोर आणले पाहिजे. त्याच्यावर चर्चा करून समितीने आपली शिफारस करावी. शिक्षण विभागाशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तसेच शिक्षण विभागाची गुणवत्ता सुधारण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. शिक्षण समितीला कुठलेही आर्थिक अधिकार नाहीत. सगळे आर्थिक अधिकार स्थायी समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे एका महापालिकेत दोन समित्यांना आर्थिक अधिकार असणार नाहीत, असेही बिडकर यांनी या बैठकीत स्पष्ट केले.


शिक्षण विभागाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेने शिक्षण समिती स्थापना केली आहे. या समितीसमोर शिक्षणाचे सर्व विषय येणे आवश्यकच आहे.

  • गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील २४६ पैकी १२८ नागरिक सुखरूप परत

९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही पुणे, दि....

पार्थ पवार यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज

मुंबई- आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजितदादा...

ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी,राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल:एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र

मुंबई-राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे...

शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता भरला उमेदवारी अर्ज:निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन केली प्रक्रिया पूर्ण

मुंबई-राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे...