बच्चे कंपनीसाठी उत्तम शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम : अभिनेत्री प्रितम कागणे
अलीकडच्या काळात लहान मुलांचं खेळणं कमी झालंय, कारण त्यांचा संपूर्ण वेळ एक तर टीव्हीवर किंवा मोबाईल मधील गेम खेळण्यात जातो. यामुळे अनेक पालक त्रस्त आहेत. शहरांमध्ये मैदान कमी झाल्याने देखील मुलं मैदानी खेळ विसरले आहेत. परंतु कृपाली शहा आणि शिना सूर्यवंशी या दोघी महिलांनी लहान मुलांसाठी भारतातील पहिले विना इलेक्ट्रॉनिक किडिंग्टन पुण्यात सुरु केले आहे, नुकतेच त्याचे उद्घाटन मराठीतील अनेक पुरस्कार विजेता हलाल सिनेमाची नायिका प्रितम कागणे हिच्या हस्ते पुण्यातील हडपसर भागात असलेल्या अमनोरा मॉल येथे करण्यात आले.
अभिनेत्री प्रितम कागणे म्हणाली की, इतके सुंदर आणि छान छान गेम यात आहेत की लहान मुलांचा वेळ कुठे निघून जाईल लक्षात सुद्धा येणार नाही. इथे आल्यावर मला माझे बालपण आठवले. खरोखर आजकाल मुलांना घराच्या बाहेर घेऊन जाऊन खेळवलं पाहिजे आणि या किडिंग्टन मध्ये त्या सर्व गोष्टी आहेत ज्या मुलांच्या खेळामध्ये शारीरिक आणि बौद्धिक विकासाला पुरक असतात.
याबाबत बोलतांना किडिंग्टनच्या संस्थापक क्रिपाली शहा म्हणाल्या की, अनेक वर्ष मी लंडन आणि सिंगापूर मध्ये राहत असल्याने तिथल्या काही गोष्टी मी किडिंग्टन मध्ये समाविष्ट केल्या आहेत. लहान मुलांना खूप खेळायचं आहे, पण त्यांचा वेळ टीव्ही आणि मोबाईलमध्येच जास्त जातो. मला असे काही करायचे होते ज्यात मुलांचा शारीरिक व्यायाम पण होईल आणि त्यात त्यांना बौद्धिक आव्हान पण असेल. शिवाय त्यात एकही गेम हा इलेक्ट्रॉनिक बटणावर नसावा हीच माझी इच्छा होती आणि तसेच आम्ही यात केले आहे. सलग तीन वर्ष पालकांचा आणि मुलांचा अभ्यास करून आम्ही हे तयार केले आहे. याला तुम्ही इनडोअर सॉफ्ट प्ले सेंटर देखील म्हणू शकतात. पब्लिक पार्क किंवा मैदानात खेळतांना हल्ली खूप अडचणी येतात उदा. मातीत अनेक विषाणू असतात, पाऊस, उन, मच्छर अशा अनेक अडचणी मैदानात येतात परंतु इथे पूर्णपणे सुरक्षित खेळता येऊ शकते.