आपण महिला दिन का साजरा करतो ?
८ मार्च रोजी संपूर्ण जगात जागतिक महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महिलांना सक्षमता, सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय आणि आर्थिक उन्नतीची उज्वल दिशा दाखवणाऱ्या त्या सर्व महिलांची आपल्याला पुन्हा आठवण व्हावी ज्यांनी महिलांना त्यांचे अधिकार देण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्या सर्व महिलांचे आभार मानण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. . पण एवढंच करून चालणार आहे का ?
नेहमीप्रमाणे महिला दिन येतो. चार- पाच भाषणं, दोन -तीन सत्कार समारंभ आणि पुरस्कार सोहळे झाले म्हणजे महिला दिन साजरा झाला असंच काहीसं चित्र आजवर आपण पाहिले आहे. परंतु कॅफेमराठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या वर्ल्ड फेमस इन महाराष्ट्र या वेब सिरीजमध्ये ‘मराठी गौरवशाली महिला‘ हा विशेष एपेसोड रिलीज करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान मराठी महिलांचा फक्त गौरव यात केला नसून या महिलांकडून आपण काय आदर्श घेतला पाहिजे हे सांगण्यात आले आहे.
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या आवाजातील ही वेब सिरिज म्हणजे डिजिटल विश्वातील मैलाचा दगड ठरणार आहे. या महान महिलांना फक्त आपण आठवून चालणार नाही तर त्यांचे विचार आपल्या अंगी बाळगून माहिलांना सर्वपरीने पुढे घेऊन जाण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे हाच कॅफेमराठी चा उद्देश आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची ओळख तयार केलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा एपिसोड रिलीज करण्यात आला. कॅफेमराठी मोबाईल अॅप आणि कॅफेमराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही हा आणि असे सर्व व्हिडीओ मोफत पाहू शकतात.

