पुणे- इंदोर येथे जाऊन आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांची भेट घेतली . आणि त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली .
गेल्या रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भय्युजी महाराज पुण्याहून इंदूरच्या दिशेने निघाले असताना पण पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावजवळ एका कारने भय्युजी महाराज यांचा रस्ता अडवला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली.तेव्हा रस्त्याशेजारीच असलेल्या दुकानांमधून काही तरुण हत्यारांसह महाराजांवर चाल करुन आले. त्यांनी चालकाला मारहाण केली. भय्युजी महाराज कारमधून उतरल्यानंतर त्या तरुणांनी त्यांच्यावरही
हल्ल्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चालक आणि सोबत असलेल्या सहाय्यकांनी त्यांना वाचवलं आणि तिथून निघण्यात ते यशस्वी झाले होते .
या पार्श्वभूमीवर आज सकाळी भागवत आणि भय्यूजी महाराज यांची भेट झाली





