20 तारखेपासून उपोषणाला बसणार भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्याचा इशारा
पुणे :
सार्वजनिक गणेश उत्सवाचा सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनीच आणि पहिला गणपती देखील त्यांनी बसवला आहे असून लोकमान्य टिळक यांनी प्रसारक म्हणून काम अधिक केले आहे. या सर्वांची कबुली महापौर मुक्ता टिळक यांनी भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत कबुली दिल्याची ऑडियो क्लिप द्वारे मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे यांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे.जर महापौरांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचे 126 वे वर्ष जाहिर न केल्यास आम्ही 20 तारखेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी रेणूसे म्हणाले की,समाजापुढे अत्यंत चुकीच्या पध्दतीने गणेश उत्सवाचा इतिहास मांडला जात आहे.यंदा पुणे महापालिकेच्या वतीने 125 वे वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.त्या महोत्सवाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी देखील त्यांच्याशी संवाद साधला.मात्र त्यांनी त्यावर काही भाष्य केले नाही.
तसेच या उत्सवापूर्वी महापौरा समवेत झालेल्या बैठकीत त्यांनी भाऊ रंगारी यांनी सुरुवात केल्याची कबुली दिल्याचे सांगितले.मात्र त्या आता पुढे येऊन बोलत नाही.या वरून अनेक शंका उपस्थित होत आहे.त्याचबरोबर भाऊ साहेबा चा फोटो महापौरांना देऊन देखीललावला नाही.यावर महापौर म्हणाल्या की,काही मंडळाचा विरोध होता म्हणून लावला नाही.जर तस असल्यास त्यांनी जाहिर करावे.मात्र ते यावर काही बोलण्यास तयार नाही.यातून त्यांची मानसिकता समोर येत आहे.अशा शब्दात त्यांनी महापौरांच्या कार्यपध्दतीवर टिका केली.
एका बाजूला 125 वर्ष की 126 असा वाद सुरु असताना भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केल्याची दखल घेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेऊन त्याची नोंद देखील घेतली आहे.मात्र आपले सर्व असताना मान्य करत नाही.अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.