
पुणे – धार्मिक कार्यात पुरूषांप्रमाणे महिलांना समान संधी मिळावी,
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा, एकमेकांमध्ये सहजता निर्माण व्हावी,
प्रदुषणमुक्त वातावरण असावे, या उद्देशाने अखिल भारतीय त्रिपदी
परिवातर्फे सहकारनगर येथील सातव सभागृहात धन्वंतरी याग करण्यात आला आहे.
त्यात सुमारे दीड हजारांहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
पाकलमंत्री गिरीश बापट, माजी आमदार उल्हास पवार, परिवाराचे अध्यक्ष डॉ.
प्रदीप ऊर्फ बाबामहाराज तराणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. बापट म्हणाले,
समाजातील सर्व महिलांना धार्मिक कार्यात समान संधी मिळून देण्याचा
प्रयत्न परिवारातर्फे करण्यात येत आहे. समाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी
टाकलेले हे सकारात्मक पाऊल आहे. हा याग सर्व स्त्री-पुरूष यांच्यासाठी
खुला होता. यात औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आला. या माध्यमातून चांगले
वातावरणनिर्मिती होण्यास आणि पर्यावरणरक्षणास मदत होत आहे असे मत ड्रॉ
तराणेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात पुणे जिल्ह्याबरोबरच ठाणे,
उज्जैन बडोदा अशा विविध भागातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा यासाठी सहकारनगर मध्ये धन्वंतरी याग
Date:

