असे उद्गार विपुल अगरवाल (जनरल मॅनेजर, बी.एस.एन.एल. भारत संचार निगम लिमिटेड) यांनी प्राध्यापक शैक्षणिक विकास, या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
’ नेटवर्किंग आणि स्विचिंग’व र प्राध्यापक शैक्षणिक विकास कार्यक्रम संपन्न
पुणे :
’ सध्याच्या युगात टेलिकम्युनिकेशन हे जलद गतीने विकसित होणारे क्षेत्र असून, प्राध्यापकांनी नेटवर्किंग आणि स्विचिंग या विषयाचे ज्ञान अभ्यासक्रमापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा जागतिकीकरणाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे
,’
हा कार्यक्रम भारती विद्यापीठ विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आयमेडीटा नेटवर्किंग लॅब्ज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
ते म्हणाले, नेटवर्किंग क्षेत्रात सध्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रायोगिक ज्ञान हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. विपुल अगरवाल यांनी टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. भारत सरकारने टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात विविध प्रकल्प जसे स्मार्ट सिटी, सी.सी.टी.व्ही. इ. प्रारंभ केले आहेत. प्राध्यापकांनी प्रायोगिक प्रशिक्षण देणार्या संधीचा फायदा घ्यावा असेही ते म्हणाले.
माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत. तथापि विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्ध बनविण्यासाठी प्राध्यापकांनी विविध विषयांमध्ये प्राविण्य मिळविणे आवश्यक आहे आणि यासारख्या कार्यक्रमामधून कौशल्य विकास होतो असे प्रतिपादन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद भालेराव यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, ‘सध्याचे विद्यार्थी हे प्राध्यापकांना आव्हान देणारे आहेत. आणि ते स्वीकारण्यासाठी प्राध्यापकांना वृद्धींगत ज्ञान असणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी भारतीय वंशाच्या ओरेगॉन स्टेटमधील पोर्टलॅण्ड शहरात पी. एचडी करत असलेल्या चैतन्य करमचेडू या विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले. त्या विद्यार्थ्यांने समुद्राच्या पाण्यातील क्षार वेगळे करून ते पाणी पिण्याजोगे बनविण्याचे नवीन यंत्र किफायतशीर दरात विकसित केले. ’
अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे प्राध्यापकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणूनच अशा कार्यशाळांना खूप महत्त्व आहे. पुढे ते असेही म्हणाले की, बीएसएनएल ही कंपनी संपूर्ण भारत देशात टेलिकम्युनिकेशनमधील आद्ययावत कंपनी आहे.’ अशा प्रायोगिक कार्यक्रमांमधून प्राध्यापकांनी स्वतःच्या ज्ञानात भर पाडली पाहिजे. जेणेकरून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
TEQIP-II च्या अंतर्गत 18 प्राध्यापक आणि 28 विद्यार्थी शैक्षणिक विकास कार्यक्रम, मार्च 2017 पर्यंत आयोजित करण्यात येणार आहेत.
इंजिनियरिंग अभ्यासक्रमामध्ये या विषयाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या अनुशंघाने 7 ते 11 फेब्रुवारी 2017 या कालावधीत इंटरनेटवर्कींग मॉडेल, राऊटिंग कॉनफिग्युरेशन आणि सिक्युरिटी वरती प्रशिक्षण देण्याचे आयोजिले आहे.
या कार्यक्रमासाठी आयमेडीटा लॅब्जतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल पाटील यांनी केले आणि डॉ. अरुधती शिंदे यांनी आभार मानले.