Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बटालियन 609 … भारत, दुबई, ओमानच्या सिनेमागृहात….

Date:

मुंबई2016 मध्ये ऊरी हल्ल्याने संपूर्ण देशातल्या प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि आजही हा विषय गहन चर्चेचा ठरला आहे. बटालियन 609 हा आगामी चित्रपट जगाला हलवून टाकणारा काश्मीरमध्ये झालेला हल्ला व त्यानंतर झालेल्या कार्यवाहीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पटकथेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पात्र महत्वाची भूमिका पार पाडत असून चित्रपटात के. के. शुक्ला यांनी चित्रपटात मोदीजींचे पात्र रंगवले आहे. या कल्पक कामाला सेन्सर बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे बटालियन 609 . हा चित्रपट आता भारत, दुबई, ओमान या देशांत बिग कर्टन्स मिडियातर्फे प्रदर्शित होतो आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्सचे सध्याचे संचालक तसेच, बॉलीवूड व जाहीरात क्षेत्रात अग्रेसर कामगिरी करणारे प्रसून जोशी यांना असा विश्वास आहे की, चित्रपट निर्मात्यांना योग्य प्रकारचा क्रिएटिव स्पेस दिला तर पटकथेला सुयोग्य न्याय मिळतो.

टीम बटालियन 609 ला जेव्हा यूए प्रमाणपत्र मिळाले, तेव्हा याच गोष्टीचा प्रत्यय आला असून त्या दृश्यालादेखील मंजुरी दिली गेली ज्यामध्ये के. के. शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका वठवणार आहेत. सर्वात जास्त उत्सुकता असणारे हे दृश्य आता दर्शक पडद्यावर बघू शकतील. यापूर्वीचे बोर्डाचे संचालक श्री. पहलाज निहालानी यांनी मोदीजींचे पात्र स्क्रीनवर प्रत्यक्ष दाखवण्यास मनाई केली होती. केवळ त्यांचा आवाज ऐकवावा, अशी परवानगी यापूर्वी देण्यात आली होती, ज्यामुळे निर्मात्यांना ते दृश्य एडीट करावे लागले होते.

प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टार शोएब इब्राहिम याने या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. ब्रिजेश बटूकनाथ त्रिपाठी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. नरैनदास लालवाणी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संगीत शैलेंद्र सयन्ती यांनी दिले आहे. ऊरी हल्ला व सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतीय व पाकिस्तानी सैनिकांचे आयुष्य कसे बदलले याभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी एका खास भूमिकेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि दूरदर्शनवर यश मिळविलेल्या शोएब इब्राहिमने मत व्यक्त करताना म्हटले, “मी बॉलीवूडमध्ये केव्हा पदार्पण करणार असे लोक मला विचारत होते आणि जी कथा माझ्या हृदयाला स्पर्श करेल अशाच भूमिका करेन असे मी सांगत असे. बटालियन 609 ही माझ्या स्वप्नातील भूमिका आहे.” चित्रपटाच्या चित्रणाच्या आठवणी सांगताना शोएब भारतीय लष्कराच्या बाबतीत अतिशय भावनाशील झाला होता आणि तो म्हणाला की आता या अनुभवानंतर माझा त्यांच्याविषयीचा आदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

बटालियन 609 चे निर्माता नारायणदास लालवाणी यांनी अतिशय उत्साहात आपले मत व्यक्त करताना सांगितले, “सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. निर्माता या नात्याने हा माझा पहिलाच चित्रपट असल्याने मोठ्या पडद्यावर याचे अर्थपूर्ण आणि चित्रपटाच्या दृष्टीने चित्रण करणे हे माझ्या आणि बटालियन 609 च्या संपूर्ण चमूच्या दृष्टीनेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे होते.”

श्री. ब्रिजेश बटूकनाथ त्रिपाठी या बटालियन 609 च्या दिग्दर्शकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले, “माझे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते आणि त्यामुळे मी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य फार जवळून अनुभवले आहे. मला ही पटकथा अतिशय आवडली आणि हा चित्रपट माझ्या मनाच्या जवळ जाणारा आहे. मला खात्री आहे की, प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्श करणारा हा चित्रपट असणार आहे. आपले सैनिक आपल्यासाठी इतके काही करत असतात आणि आपल्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतात. माझा चित्रपट मी भारतीय लष्कराला आणि देशासाठी निस्वार्थी भावनेने आपले आयुष्य पणाला लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना अर्पण करत आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...