आयोजन समिती सदस्य एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची माहिती
न्युयोर्क( अमेरिका): भारताचे सुपुत्र विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही युनायटेड नेशन्स मध्ये साजरी झाली असून यावर्षी प्रथमच युनायटेड नेशन्स संयुक्तरित्या या आयोजनामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे सुपुत्र दिलीप म्हस्के हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या “फाउंडेशन फॉर ह्युमन हॉरीझन” या संस्थेने हे ऐतिहासिक पाऊल उचलले होते. या ऐतिहासिक जयंती सोहळ्याला युनायटेड नेशन्सचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमिना जे. मोहम्मद , ‘आय.बी. एम.’ चे जनरल मेंनेंजर डॉ. जुलिया ग्लीडेन, गुगल चे क्रीएटिव्ह हेड ऑलिव्हर राबेन्स्चाग, हिटलॅब चे चेअरमन प्रोफ.स्टेन काचोन्वास्की, ‘ऑफिस ऑफ प्रोवोस्ट’ चे केथ्रीन न्यूमन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अमेरिकेचे हेड पद्मजा चंद्रु व ‘द इंडिया नेटवर्क’ चे राहुल नार्वेकर हे उपस्थित होते. मुख्य म्हणजे या सर्वांचा सत्कार दिलीप म्हस्के यांच्या मातोश्रीच्या हस्ते करण्यात आला. दिलीप म्हस्के हे मुळचे जालना चे असून एके काळी अत्यंत गरिबीमुळे त्यांची आई कचरा वेचण्याचे काम करत असे, आज त्याच आई ला युनायटेड नेशन्स च्या मुख्यालात सर्वांचा सत्कार करायला भेटणे हे “एका मुलाने आईला दिलेले सर्वोच्च गिफ्ट आहे”. याचे अमेरिकेत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या जयंती निमित्त “इंपॉवरिंग पिपल थ्रु डिजिटल टेक्नोलॉजी फॉर सोशल अॅण्ड फायनान्स इलुजन” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीचे आयोजन युनायटेड नेशन्स च्या मुख्यालयात अमेरिकन प्रमाणवेळेनुसार १३ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत व भारतीय दुतावासात १४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत करण्यात आले.
गेल्या वर्षी युनायटेड नेशन्स च्या मुख्यालयात साजऱ्या झालेल्या जयंतीमध्ये युनायटेड नेशन्स सहभागी नव्हती पण या वर्षी युनायटेड नेशन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने प्रेरित होवून जयंतीमध्ये संयुक्तिकरीत्या सहभागी झाली होते. यावेळी सर्वानीच डॉ. बाबासाहेबांबद्दल आपले विचार प्रकट करून जागतिक दृष्टीने त्यांच्या विचारांचे आचरण किती महत्वाचे आहे हे सांगितले.जयंती साजरी करण्याच्या आधी अमेरिकेतील सर्व भारतीयांनी खूप मोठी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी “जय भीम” च्या नाऱ्याने न्युयोर्क शहर दुमदुमून गेले. अनेक भारतीय तसेच अमेरिकन लोकही बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून या कार्यक्रमाला उपस्थीत होते. या कार्यक्रमासाठी मुळचे सोलापूरचे असलेले औदुंबर गवळी यांनीही हजेरी लावली होती. तसेच अनेक भारतीयांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे व बाबासाहेबांच्या प्रेमामुळे असे कार्य करण्याचे प्रेरणा मिळते असे दिलीप म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
“दिलीप म्हस्के यांच्या पुढाकाराने इथून पुढे दरवर्षी अमेरिकेतील युनायटेड नेशन्समध्ये होणाऱ्या जयंतीसाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांना अमेरिकेत बोलावण्याचे काम आम्ही करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय इतरही महापुरुषांचे कार्य जगापुढे आणून त्यांची जयंती युनायटेड नेशन्स मध्ये साजरी करण्यास प्रयत्न करणार” असे एव्हरेस्टवीर विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे म्हणाला.

