बजाज इलेक्ट्रिकल्सची चौथ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी

Date:

ग्राहक उत्पादन (सीपी) विभागाच्या उत्पन्नात 31 टक्क्यांची वाढतर ईबीआयटी 67 टक्क्यांनी वधारला

करपूर्व नफा 2 कोटी रुपये तोट्यातून 72 कोटी रुपये नफ्यात

बजाज इलेक्ट्रिकल्स लि.ने 31 मार्च 2021 रोजी संपलेली तिमाही व वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

2020-21 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचे गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील ऑपरेशन्सचे विक्री/उत्पन्न 1301 कोटी रुपये यंदा 3.2 टक्क्यांनी कमी होऊन 1258 कोटी रुपयांवर गेले आहे. तिमाहीमधे कंपनीने अनुक्रमे 72 कोटी आणि 54 कोटी रुपयांचा करपूर्व व करोत्तर नफा कमावला आहे. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीमधे कंपनीचा करपूर्व तोटा 2 कोटी रुपये, तर करोत्तर तोटा 1 कोटी रुपये होता.

तिमाहीमधे कंपनीच्या ग्राहक उत्पादन (कन्झ्युमर प्रॉडक्ट- सीपी) विभागाने गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील तिमाहीतील 747 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न यंदा 30.6 टक्क्यांनी वाढवून 975 कोटी रुपयांवर नेले आहे. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत 50 कोटी रुपये असलेला ईबीआयटी यंदा 67.4 टक्क्यांनी वाढून 85 कोटी रुपयांवर गेला आहे. सीपी ऑपरेटिंग मार्जिन्स 8.7 टक्के आहे. ईपीसी विभागाने तिमाहीत एकूण 283 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 554 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा 48.9 टक्क्यांची घट झाली आहे. ईपीसीने 8 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला असून गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील तोटा 23 कोटी रुपये होता.

31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षात कंपनीच्या ऑपरेशन्सद्वारे 4585 कोटी रुपयांची विक्री/उत्पन्न झाले असून गेल्या वर्षातल्या याच कालावधीतील 4987 कोटी रुपयांत यंदा 8.1 टक्क्यांची घट झाली आहे. वर्षाअखेरीस कंपनीने अनुक्रमे 246 कोटी रुपये आणि 189 कोटी रुपयांचा करपूर्व नफा व करोत्तर नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने 7 कोटी रुपये करपूर्व नफा आणि 10 कोटी रुपये करोत्तर तोटा नोंदवला होता.

वर्षाअखेर कंपनीच्या ग्राहक उत्पादन विभागाने गेल्या वर्षाच्या याच कालावधीत मिळवलेला 3095 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न यंदा 7.1 टक्क्यांनी 3315 कोटी रुपयांवर गेले आहे. सीपी विभागाने 320 कोटी रुपयांचा ईबीआयटी मिळावला असून गेल्या वर्षीच्या 200 कोटी रुपयांच्या ईबीआयटीमधे यंदा 59.5 टक्के वाढ झाली आहे. सीपी ऑपरेटिंग मार्जिन्स 9.6 टक्के आहे. ईपीसी विभागाने 1269 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले असून गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील 1892 कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नामधे यंदा 32.9 टक्के घट झाली आहे.

आर्थिक वर्ष 21 च्या अखेर कंपनीने ऑपरेशन्स विभागातून गेल्या वर्षाच्या याच कालावधीकील 626 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा 658 कोटी रुपयांचा सकारात्मक कॅशफ्लो नोंदवला आहे. कर्ज 31 मार्च 2020 मधील 962 कोटी रुपयांवरून कमी होऊन 31 मार्च 2021 रोजी 471 कोटी रुपयांवर गेले आहे. 31 मार्च 2021 रोजी निव्वळ कर्ज 425 कोटी रुपये आहे.

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर बजाज म्हणाले, ‘या तिमाहीतील आमच्या दमदार कामगिरीने मी आनंदी झालो आहे. तिसऱ्या तिमाहीनंतर कमॉडिटीच्या किंमती वाढून त्याचा एकंदर मागणीवर विपरीत परिणाम झालेला असतानाही ग्राहक उत्पादन विभागाने या तिमाहीमधे चांगली कामगिरी केली. आमच्या ईपीसी विभागाने आपला तोटा आणखी कमी केला असून खेळते भांडवल आणि अमलबजावणीवर जास्त भर दिला. पूर्ण वर्षाकडे पाहायचे झाल्यासमहामारीचा परिणाम होऊनही आम्ही आमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत राहात एकंदरीत दमदार धोरण सादर केले. आम्ही 658 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग कॅशफ्लो तयार केलाकर्ज कमी केले आणि एक कंपनी या नात्याने आजपर्यंतचा सर्वाधिक नफा नोंदवला.’

1 एप्रिल 2021 आमचे ऑर्डर बुक 1116 कोटी रुपयांचे असून त्यात 476 कोटी रुपयांचे ट्रान्समिशन लाइन टॉवर्स, उर्जा वितरणासाठी 224 कोटी रुपये आणि प्रकाशयोजना प्रकल्पांसाठी 416 कोटी रुपयांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...