बहिणाबाई सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्कार २०२२”खंडूराज गायकवाड यांना जाहीर…!

Date:

येत्या २३ एप्रिल रोजी जळगाव येथील भव्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान..

मुंबई-यंदाचा “बहिणाबाई सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्कार” खंडूराज गायकवाड यांना जाहीर झाला असून सदर पुरस्कार येत्या २३एप्रिल रोजी जळगाव येथे भरविण्यात येणाऱ्या बहिणाबाई महोत्सवात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.खान्देशी कला आणि संस्कृती ग्लोबल व्हावी आणि त्याचे संवर्धन व्हावे. यासाठी दरवर्षी बहिणाबाई चौधरी महोत्सव समिती आणि भरारी बहुद्देशीय संस्था (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने भव्य असा महोत्सव आयोजित करते.या महोत्सवात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला समृद्ध आणि लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी बहिणाबाई चौधरी सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाते.
यावर्षी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य आणि मंत्रालयातील राजकीय वृत्तसंकलन करणारे पत्रकार खंडूराज गायकवाड यांच्या नावाची निवड महोत्सव समितीच्या आयोजकांनी केली आहे.
कोविड-१९ च्या महामारीच्या काळात अडचणीत सापडलेल्या लोककलावंताच्या पाठीशी भक्कमपणे खंडूराज गायकवाड हे उभे राहिले होते.त्यांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळलेले असताना देखील महाराष्ट्रातील कलावंताच्या व्यथा त्यांनी शासन दरबारी पोहचविल्या होत्या. कोविड महामारीच्या काळात वयोवृध्द कलावंताचे मानधन अनेक महिने थांबले होते.ते त्यांनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.आर्थिक संकटात सापडलेल्या लोककलावंतना कोरोना पॅकेज जाहीर करण्यासाठी त्यांनी महत्वाचा पाठपुरावा केला होता..सांस्कृतिक कार्यक्रम बंद झालेले असताना,ते पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांचा इतरांबरोबर मोठा वाटा आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन “बहिणाबाई सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्कार २०२२” हा खंडूराज गायकवाड यांना घोषित करीत आहोत.असे महोत्सव समितीच्या आयोजकांचे म्हणणे असून येत्या २३एप्रिल २०२२रोजी जळगाव येथील सागर पार्कवर भव्य सोहळ्यात त्यांना सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहोत.असे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...