पुणे-वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सहकारनगर नं१ / २. पद्मावती, शिवदर्शन , चव्हाणनगर , तावरे कॉलनी , अध्यापक कॉलनी, अरणेश्वर आदींसह सर्वच परिसरातील नागरिक त्रस्त झाली आहेत. तक्रार करूनही आपले खाते कोणतीच दखल घेत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे रुग्णांचे ,ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे एकतर सुरळीत वीज पुरवठा दया ;अन्यथा वीज बिल आम्ही भरणार नाही असा निर्णय नागरीकांनी घेतला आहे.तरी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल,त्यातही खंडित वीजपुरवठ्याचे सत्र सुरु राहिल्यास कोणत्याही स्थितीत नागरिक वीजबिल भरणार नाहीत याची आपण नोंद घ्यावी
असा इशारा देणारे निवेदन आज महावितरण ला कॉंग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल तसेच भावे काका, धनु कांबले, संतोष पवार, अभिषेक बागुल, बाबलाल पोलके ,समीर शिंदे इम्तियाज तांबोळी , महेश धवले, राम रणपिसे ,विजय बिबवेयांनी दिले .