भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील
यांचा उपक्रम
पुणे – रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आयुष-६४ ही आयुर्वेदिक औषधे वडारवाडी येथील कर्मवीर मोफत कोरोना केअर सेंटर आणि खडकीतील हरिअण्णा स्टेडियम कोरोना केअर सेंटर येथील कोरोनाबाधीत रुग्णांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) वाटण्यात आली.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयुष-६४ हे परिणामकारक औषध वाटपाचा उपक्रम भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी हाती घेतला आहे. त्या अंतर्गत वडारवाडी आणि खडकीतील रुग्णांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कोरोनाला हरवायचे असेल तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुष-६४ औषधाचे सेवन करावे, असा सल्ला केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेला आहे. या औषधांची चाचणी सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स या संस्थेने केली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणासाठी या औषधाचे सेवन करणे चांगले असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
औषधाच्या वितरण प्रसंगी भाजपचे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, रविंद्र साळेगावकर, प्रतुल जगडे, गणेश बगाडे, दयानंदजी इरकल, धर्मेश शहा, दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर, अभय सावंत, मुकेश गवळी, अपर्णा कुऱ्हाडे, श्याम काची, नेहा गोरे, सुरेंद्र भाटी, ओंकार केदारी, सागर धोत्रे, राहुल माने, रोहित खोमणे, रोहित श्रीधर आदी उपस्थित होते.

