कार्बन उत्सर्जन शुन्यावर आणण्यासाठी पुण्यातून जागृकता अभियानाला सुरुवात.

Date:

पुणे – जागतिक तापमानवाढीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून याचे परिणाम केवळ मानवाच्या आरोग्यावरच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे भारताने २०७० वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यावर आणण्याचे मिशन हाती घेतले आहे. याबाबतील इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स संस्थेने मोलाचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने जागरुकता अभियान आतापासूनच सुरु केले आहे. यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये अहमदाबाद येथे रेफ्रिजरेशन आणि शीत साखळी (कोल्ड चेन) संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषद व मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याचीच सुरुवात पुण्यात नुकतीच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीचे उद्घाटन आणि जागरुकता परिषदेचे आयोजन करुन करण्यात आली. यापरिषदेला संपूर्ण भारतातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून डेअरी आणि कोल्डस्टोरेज क्षेत्रातील विविध संस्थांचे अध्यक्ष या परिषदेस उपस्थित होते.

इशरेचे राष्ट्रीय अध्यक्ष स. चंद्रशेखर, पंकज धारकर, अरविंद सुरंगे, विक्रम मूर्ती, मुकुंद रानडे, रमेश परांजपे, मिहीर सांगवी आणि पुणे शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे, आशुतोष जोशी यावेळी उपस्थित होते.

चिलर कॉन्क्लेव्ह व हिट पंप कार्निवलमध्ये राज्यातील कृषी उत्पादक कंपन्या, रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन शीतगृह व शीत वाहक कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. साऊथ एशियाच्या सर्वात मोठ्या चिलर रेफ्रिजरेशन अँड कोल्ड स्टोरेज या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

इशरेचे पुणे अध्यक्ष विरेंद्र बोराडे म्हणाले की, रेफ्रिजरेटर, कोल्ड स्टोरेज आणि एअर कडींशनिंगची बदलती प्रणालीचा कार्बन उत्सर्जनावर मोठा परिणाम होत आहे. पर्यावरण आणि हवामानबदलात या क्षेत्राचा प्रभाव जास्त आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारी इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स या नामवंत संस्थेच्या पुणे शाखेतर्फे तळागाळातील सर्व लोकांना एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेशन या क्षेत्राचा वापर करून आपले उत्पादन कसे जास्तीत जास्त काळासाठी उपलब्ध करून देता येईल यावर व्याख्यान आणि जागरूकता अभियानाचे आयोजन केले होते.

चेतन नरके म्हणाले की, देशाच्या सार्वांगिण प्रगतीसाठी अशा प्रकारचे चर्चासत्र, परिषदांचे आयोजन होणे गरजेचे आहे. शेतमाल आणि अन्नधान्याची साठवणूक जास्त काळापर्यंत करण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता भासते. सध्या २१४ मिलीअन स्केअर फिट कोल्ड स्टोरेज क्षमता आहे. २०२८ पर्यंत यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ या क्षेत्रात होणारी आहे. औषध उत्पादन क्षेत्र, कृषी आणि डेअरी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या क्षेत्राचे योगदान मोठे आहे.

कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात भारतीय दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष चेतन अरुण नरके, महाराष्ट्राचे निवृत्त विशेष सचिव एस के गोयल, राजेंद्र जोग- एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सिंजेंटा फाउंडेशन, कालिदास भांगरे-मॅनेजिंग डायरेक्टर टेस्ट इंडिया, बीबी काळे हेड ऑफ मार्केटिंग इमर्शन, शारंग नातू, उमेश कांबळे, जयंत जोशी अध्यक्ष डी टी ए, अविनाश मंजूल मॅनेजिंग डायरेक्टर किर्लोस्कर डीलर, डॉक्टर रामराजे पाटील हेड ऑफ फार्म कन्सल्टन्सी दे लवाल, लालजी सावला अध्यक्ष नवी मुंबई कोर्ट स्टोरेज मॅन्युफॅक्चरर्स, अशोक डाक सभापती नवी मुंबई, अशोक गोळीबार हेड ऑफ मार्केटिंग उपस्थित होते.

भारतातील सर्वात जुनी आणि अगदी नामांकित अशी इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स ही संस्था गेली ४३ वर्षे एयर कंडीशन या क्षेत्रात नाविन्यपूर्ण असे प्रयोग शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी करीत आहे. यावर्षी ८,९,१० डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे रेफ्रिजरेशन आणि गोल्ड चेन संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषद व मेळावा आयोजित केला आहे त्या अनुषंगाने पुणे शाखेने या रेकॉर्डिंग संदर्भातील जागरूकता अभियान चे आयोजन केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...