SHARAD LONKAR

57131 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

हैदराबाद मेट्रो रेलला तेलंगण व आंध्र प्रदेश या राज्यांचे राज्यपाल नरसिंहन यांनी आज दाखवला हिरवा झेंडा

हैदराबाद-अमीरपेट ते एलबी नगर या भागातील व्यावसायिक कार्याला सुरुवात झाल्याचे जाहीर करताना एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेडलाअतिशय आनंद होत आहे. तेलंगण व आंध्र प्रदेश या राज्यांचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांच्या हस्ते, तेलंगणचे एम व यूडी मंत्री केटीराम राव, तेलंगण सरकारचे मुख्य सचिव, आयएएस डॉ. एसके जोशी, एचएमआरएलचे व्यवस्थापकीय संचालक, आयआरएएस एनव्हीएसरेड्डी, एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीबी रेड्डी व अन्य मान्यवरांच्याउपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सर्व मान्यवरांनी अमीरपेट ते एलबी नगर असा 16 किमीचा प्रवास केला. हा भाग कॉरिडॉर 1 – मियापूर ते एलबी नगर (रेड लाइन) मार्गाचा भाग आहे. अमीरपेट ते एलबी नगर या भागामध्ये 16 स्थानके असून, त्याने नोव्हेंबर 2017 मध्ये दाखल झालेल्या व सध्या कार्यरत असलेल्या 30 किमीच्या (मियापूर – अमीरपेट – नागोले) मार्गामध्ये 16 किमीची भर घातली आहे. हा 16 किमीचा भाग मियापूर ते एलबी नगर असा 27 स्थानकांचा 29 किमीचा कॉरिडॉर 1 – रेड लाइन हा मार्गपूर्ण करतो. 16 स्थानके – पंजागुत्ता, इरुमंझिल, खैरताबाद, लकडी-का-पूल, असेम्ब्ली, नामपल्ली, गांधी भवन, उस्मानिया मेडिकल कॉलेज, एमजीबीएस, मलकपेट, न्यू मार्केट, मूसरामबाग, दिलखुषनगर, चैतन्यपुरी, व्हिक्टोरिया मेमोरिअल व एलबी नगर. राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी नमूद केले, “मी जगभरातील अनेक मेट्रोंतून प्रवास केला आहे आणि हैदराबाद मेट्रो ही जगातीलसर्वोत्तम मेट्रोंपैकी एक आहे. हैदराबादकर या जगातिक दर्जाच्या सुविधेचा पूर्णतः वापर करतील आणि येत्या काही वर्षांत हैदराबाद मोठीझेप घेईल, अशी अपेक्षा आहे.”  या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त करत, तेलंगणचे एम व यूडी मंत्री केटी राम राव यांनी, अमीरपेट – एलबी नगर मेट्रोचे उद्घाटन केल्याबद्दलव या समारंभासाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांचे आभार मानले.   या निमित्ताने, एनव्हीएस रेड्डी यांनी नमूद केले, “दिल्लीनंतरचे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब मेट्रो नेटवर्क असलेली हैदराबादमेट्रो हा पीपीपी तत्त्वावरील जगातील सर्वात मोठा मेट्रो रेल प्रकल्प आहे. ही सक्षम मास ट्रान्झिट सिस्टीम आहे आणि त्यामुळे भारतीयशहराचे रुपांतर एका सोयीच्या, हरित शहरामध्ये करण्याची संधीही मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठे परिवर्तन येणार असून, हैदराबादच्या विकासाला चालना मिळणार आहे.” या वेळी बोलताना, एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीबी रेड्डी यांनीसांगितले, “हैदराबादकर या मेट्रोच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अमीरपेट ते एलबी नगर या भागात मेट्रो सुरूझाल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. लोकांनी हैदराबाद मेट्रो रेल सेवेचा सहर्ष स्वागत केले आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकाचेआभारी आहोत. एलअँडटी वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या, तसेच राष्ट्रनिर्मितासाठी योगदान देणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधाप्रकल्पांसाठी प्रसिद्ध आहे.” “आज, या प्रतिष्ठित प्रकल्पाच्या आणखी 16 किमी मार्गाचे उद्घाटन केल्याने, हैदराबादसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माणकरण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये आणखी एक मैलाचा टप्पा साध्य केला आहे. हैदराबादचे रूपांतर एका आधुनिक व प्रवाशांसाठी सोयीच्याशहरामध्ये करण्यासाठी या प्रकल्पाला इतके महत्त्व दिल्याबद्दल आम्ही राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांचे आभारी आहोत. हैदराबाद मेट्रोरेलमुळे हैदराबादमधील प्रवास सुरळीत व विनासायास होणार आहे,” असे त्यांनी सांगितले. पार्श्वभूमी: एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेड ही तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन व वित्तीय सेवा अशा क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व 18 अब्ज डॉलरहून अधिक उलाढाल असलेल्या भारतीय बहुराष्ट्रीय समूहाची उपकंपनी आहे.  कंपनी जगातील 30 हून अधिक देशांत कार्यरतआहे. ग्राहक-केंद्री दृष्टिकोन व सातत्याने दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न यामुळे एलअँडटीला गेली सात दशके आपल्या प्रमुख उद्योगांमध्येआघाडीचे स्थान मिळवणे व टिकवणे शक्य झाले आहे.

कात्रज कोंढवा रस्त्याचं श्रेय आ.टिळेकरांना नाहीच, हे काम राष्ट्रवादीचे -प्रकाश कदम

पुणे-कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरु होत असून याचे श्रेय राष्ट्रवादीचेच आहे . भाजपचे आ. टिळेकर यांनी या साठी काहीही केले नाही ते...

बिबटे निघाले घोळक्याने धास्ती धरली बळीराजाने

ओतुर(संजोक काळदंते)- जुन्नर तालुक्यातील अनेक गावातील शिवारात आणि गावात देखील बिबट्याचा वावर असल्याबाबत जोरदार चर्चा आहे.मात्र हे शिवारांमध्ये फिरणारे बिबटे आता एक दोन नसुन चार...

‘इग्नाइट ३.०’मध्ये ‘रायसोनी’चे विद्यार्थी चमकले

पुणे : नागपूर येथे आयोजिलेल्या 'इग्नाइट ३.०' या स्टार्टअप स्पर्धेत वाघोली येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील मयूर आंबेगावकर व मंगेश अंबुरे...

जुने एटीएम कार्ड नि:शुल्क बदलून घ्या – बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहकांना आवाहन

पुणे-बँक ग्राहकांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड, नव्याईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाने बदलून देण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह...

Breaking

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...
spot_imgspot_img