पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कायमच अग्रेसर असणाऱ्या गोयल गंगा समूहातर्फे हेल्थ डिलाईट कार्ड तयार करण्यात आले आहे. नुकतेच गोयल गंगा समुहाचे संचालक अतुल गोयल, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक शिकारपूर आणि एनएआर इंडियाचे अध्यक्ष रवी वर्मा यांच्या हस्ते समूहाचे कर्मचारी वर्ग व ग्राहकांना वितरित करण्यात आले.
यावेळी गोयल म्हणाले की, कर्मचारी वर्ग आणि ग्राहक यांना योग्य सोयी सुविधा देण्यास आम्ही कायमच तत्पर असतो. याबरोबरच बदलत्या जीवनशैलीनुसार त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील आम्ही आमचे कर्तव्य समजतो. या उद्देशानेच आम्ही हेल्थ डिलाईट कार्ड तयार केले आहेत. यात संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक स्वास्थाविषयी संपूर्ण माहिती असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, दिसायला एटीएम कार्डप्रमाणे असणारे हे कार्ड अगदी मोफत स्वरूपात देण्यात येत आहे. यावर नमूद करण्यात येणाऱ्या कोड नंबरवरून कार्डधारकास कुठल्याही रुग्णालयात सहज सेवा मिळू शकते. एका दृष्टीक्षेपात आवश्यक माहिती उपलब्ध झाल्याने आपत्कालीन परिस्थितीच्या वेळेस हे कार्ड खूप फायद्देशीर ठरू शकते. कमी वेळेत अचूक निदान होऊन रुग्णांच्या वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होऊ शकते. बागळण्यास अतिशय सहज आणि सोपे व्हावे, अशा पद्धतीनेच कार्डची रचना करण्यात आली असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
पूर्वीच्या आजार ब व्याधींविषयी वैद्यकीय माहिती, बेशुद्ध रुग्णांबद्दलची आरोग्य माहिती , सुधारित संचार आणि आरोग्य प्रदाते , चिकित्सक , उपचार पद्धती, अनुवांशिक व्याधींची माहिती, वैद्यकीय तपासणी व त्याचे अहवाल याची माहिती आदी उद्देशाने एक अचूक संकलन असणारे हे कार्डधारक आणि वैद्यकीय सल्लागार दोघांच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकते.
फोटो :- गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांच्या समवेत कार्डाचे वितरण करताना संगणक तञ दीपक शिकारपूर आणि एनएआर इंडियाचे अध्यक्ष रवी वर्मा

