पुणे- रात्री उशिरा पुण्यात येताच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमेय्यांवरहल्ला प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे, पहा आणि ऐका त्यांनी काय म्हटले आहे …
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालीसा म्हणण्यास शिव सैनिकांचा विरोध, त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पुणे दौर्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना विचारले असता ते म्हणाले की, या लोकांचे जे जे घोटाळे बाहेर काढतील, त्यांना जीवे मारण्याची नवीन प्रवृत्ती यांनी सुरू केली आहे.
या प्रवृत्तीना आम्ही घाबरणार नाही.जशाच तस उत्तर देण्यास सक्षम आहोत,आम्ही यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू,इट से इट बजा देंगे असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी दिला.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आता प्रश्न एवढाच आहे की,किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्टेड आहे. किरीट सोमय्या यांनी पोलिस स्टेशनला ऑफिशियल कळविले होते.मी भेटायला येतो आहे.पोलिस स्टेशनमध्ये भेट झाल्यावर सांगितले की,70 ते 80 जणांचा जमाव बाहेर आहे आणि तो जमाव माझ्यावर हल्ला करणार आहे.त्यांच्याकडून ऑफिशियल कळविण्यात आल होत की, माझ्यावर पोलिस स्टेशन च्या आवारात हल्ला होणार आहे.त्या संदर्भातील अगोदर क्लिअरन्स करा, त्यानंतर मी बाहेर जाईल.एवढ क्लिअर सांगितल्यानंतर देखील पोलिसांनी या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही.उलट जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला, शिवसैनिकांना, तेथील लोकांना, गुंडांना, परवानगी दिली. म्हणजे एकूणच पोलिसांच्या संरक्षणामध्ये गुंडागर्दी चाललेली आहे. खरं म्हणजे पोलिसांना शर्म वाटायला पाहिजे. जर ते झेड प्लस प्रोटेक्टेड कळविल्यावर देखील त्यांना जर संरक्षण देऊ शकत नसतील. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे.मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवलेली आहे.देशातील सर्वोत्तम पोलिस यंत्रणा आज इतक्या दबावाखाली सरकारच्या नोकरा सारखं वागत आहे. लोकशाही पायाखाली तुडवली जात आहे. ही परिस्थिती अतिशय भयावह आहे. एवढच नाही तर सर्व सेक्शन बेलेबल असताना देखील आणि रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलिस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही. हे माहिती असताना देखील कायदा पायदळी तुडवून, सर्वच न्यायालयाचे सर्व नियम पायदळी तुडवून, त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे हा एकूणच गंभीर प्रकार आहे. त्यावर मी उद्या गृहमंत्री आणि सचिव यांना पत्र लिहणार आहे.या प्रकरणातील पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी करणार आहे. जे पोलिस एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यां सारखे वागत आहेत.त्यांच्या समोर अशा प्रकारचे हल्ले होत असतील,तर हे खपवून घेतले जाणार नाही.त्यामुळे आज सरकारला इशारा देऊ,इच्छितो की आम्हाला या ठिकाणी घाबरू शकत नाही.आम्ही घाबरून जाईल असे समजू नका,आम्ही कायदा सुव्यवस्था पाळतोय,याचा अर्थ तुम्ही आमच्यावर हल्ले कराल,असे होत नाही.जशाच तसे जवाब देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. जर पोलिसाना हे पाहायचे असेल तर त्यांना देखील आमची ताकद दाखवून देऊ शकतो.त्यामुळे हे जर तात्काळ बंद केले नाही.तर यावर आम्ही देखील लढाई केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की,एका महिलेला हे इतके घाबरले की,हजारो लोक त्या करिता जमा करावे लागले.पोलिसांची मदत घ्यावी लागली. खोट्या केसेस टाकाव्या लागल्या,एका महिलेला आणि हनुमान चालीसा याला विरोध करण्या करिता अख्खी मुंबई वेठीस धरण्याच काम यांनी केले

