ऑर्डर शाकाहारी ..डिलिव्हरी मांसाहारी ..झोमॅटो आणि हॉटेलला ५५ हजारांचा दंड

Date:

पुणे-पुण्यातील ग्राहक मंचाने एका हॉटेलला चक्क ५५ हजारांचा दंड ठोठावला आहे. झोमॅटो या फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशनवरुन एका ग्राहकाने पनीर असलेल्या पदार्थाची ऑर्डर दिलेली असताना या हॉटेलने मांसाहारी पदार्थ (चिकन) या व्यक्तीच्या घरी पाठवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हॉटेलकडून ही चूक एकदा नाही दोन वेळा घडल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने ग्राहक मंचाकडे तक्रार केल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली.षण्मुख देशमुख असे तक्रारदार ग्राहकाचे नाव असून ते मुळचे नागपूरचे आहेत. पेशाने वकील असणाऱ्या षण्मुख यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ३१ मे रोजी प्रित पंजाबी स्वाद या हॉटेलमधून स्विगीवरुन पनीर मसाला या डिशची ऑर्डर दिली होती. मात्र स्विगीवरुन पदार्थ घरी आल्यानंतर तो खाल्ल्यावर षण्मुख यांना तो पदार्थ पनीर नसून चिकन असल्याचे समजले. दोन्ही पदार्थ दिसायला सारखेच असल्याने डिलेव्हरी बॉयने आणून दिलेला पदार्थ मांसाहारी पदार्थ असेल याचा अंदाज आला नाही आणि मी तो खाल्ल्याचे षण्मुख म्हणाले. संबंधित प्रकार षण्मुख यांनी हॉटेलला फोन करुन कळवल्यानंतर हॉटेलने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली. तसेच पनीर मसाला दिलेल्या पत्त्यावर पाठवत असल्याचे षण्मुख यांना सांगितले. हॉटेलने दिलेल्या आश्वासनानुसार काही वेळामध्ये षण्मुख यांना दुसरी ऑर्डर मोफत देण्यात आली. मात्र यावेळीही पनीर मसालाऐवजी बटर चिकन हा पदार्थ हॉटेलने पाठवला होता. त्यामुळे षण्मुख चांगलेच संतापले आणि त्यांनी याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रार केली. मांसाहारी पदार्थ पाठवल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून यासाठी हॉटेल आणि स्विगी जबाबदार आहे. घडलेल्या प्रकारासाठी मला पाच लाखांची नुकसान भरपाई आणि जो मनस्ताप झाला त्याचा मोबदला म्हणून एक लाख रुपये देण्यात यावे असे षण्मुख यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते.

ग्राहक मंचाच्या सुनावणीदरम्यान झोमॅटोने या सर्व प्रकरणामध्ये आमची काहीच चूक नसून हॉटेलने संबंधित ग्राहकाचा चुकीचा पदार्थ पाठवल्याचे नमूद केले. तसेच देशमुख यांचे पैसेही झोमॅटोने परत केले असल्याने केवळ बदनामीच्या उद्देशाने आम्हाला या प्रकरणात अडकवले जात असल्याचे झोमॅटोने ग्राहक मंचाचसमोर आपली बाजू मांडताना सांगितले. दुसरीकडे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांच्याकडूनच ही चूक झाल्याचे मान्य केले. मंचाने हॉटेल आणि झोमॅटोला देशमुख यांना ५० हजारांची नुकसान भरपाई आणि मानसिक त्रास झाला त्याबद्दल पाच हजारांची भरपाई अशी एकूण ५५ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे महापौरांचे आदेश,दिड तासात पुण्यात ३६ ते १०४ मिमी पाऊस

पुणे- महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.०२/०४/२०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ०५.००...

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा...

समर्थ पथ कर्वेनगर पुन्हा पाण्यात ..”सफाई” ची चौकशी करा

 पुणे- समर्थ पथ कर्वेनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करूनही...

वीजपुरवठ्याची लपाछपी:वीज कर्मचाऱ्यांची कसरत

झाडे पडणे, पाणी तुंबल्यामुळे वीजवाहिन्या बाधित-दुरुस्तीचे काम वेगाने सुरू पुणे, दि. २ एप्रिल,...