Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कर्करोगाविरुद्धच्या लढयात ऑप्ट्रास्कॅन च्या तांत्रिक उपकरणाला जगातील सर्व स्तरांकडून मान्यता

Date:

  • बायोमेडिकल इंजिनियर श्री. अभि घोलप यांनी हे तंत्रज्ञान संकल्पित केले आहे
  • या तंत्रज्ञानामुळे प्रचलीत ऑप्टिकल मायक्रोस्कोपची गरज संपुष्टात येईल आणि कर्करोगाचे निदान अचूक होईल
  • डिजिटल पॅथोलॉजी हे एक स्वस्त आणि सर्वांना परवडणारे तंत्र आहे

पुणे-कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी ऑप्ट्रास्कॅन चा एन्ड-टू-एन्ड डिजिटल पॅथोलॉजी प्लॅटफॉर्म हा एक योग्य आणि शक्तिशाली सहयोगी असणार आहे. कर्करोगाचे निदान आणि संशोधन या दोन्हीमध्ये अधिक निः पक्षाता व अचूकता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भारत सरकारच्या बायोटेकनॉलॉजी इंडस्ट्रियल पार्टनरशिप प्रोग्रॅम (बीआयपीपी) च्या सहकार्यामुळे ऑप्ट्रास्कॅन ने त्यांच्या पूर्णपणे वेगळ्या अशा डिजिटल स्लाईड स्कॅनरचे वस्तुमान प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

पुण्याचे जैव-वैद्यकीय अभियंता आणि एक प्रतिष्ठित टेक्नोक्रॅट उद्योजक श्री. अभि घोलप यांना १७ पेटंट्स मिळाले आहेत. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून ऑप्ट्रास्कॅन डिजिटल पॅथॉलॉजीचा हा प्लॅटफॉर्म उभारून श्री. घोलप यांनी लोकांच्या फायद्याचे एक योग्य व्यावसायिक मॉडेल जगापुढे आणले आहे.

या पत्रकार परिषदेत ऑप्ट्रा ग्रूप या कंपनी चे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. अभि घोलप म्हणाले “भारत हा नेहमी आयटी-सेवा देणारा देश म्हणून ओळखला जातो, परंतु भारतात मोठे शोध लावले जात नाहीयेत, या गोष्टीवर श्री. नारायण मूर्ती यांनी निराशा व्यक्त केली होती. पण  ऑप्ट्रास्कॅन गर्वाने म्हणतो की १५० वर्षांपासून चालत आलेल्या या ऑप्टिकल मायक्रोस्कोपीच्या पद्धतीला बदलून एक आधुनिक रोगनिदान पद्धती आणण्यासाठी तयार आहोत आणि लवकरच इतर देशातील कंपन्या या तंत्रज्ञानाचा परवाना आमच्याकडून घेतील.”

ते पुढे असे म्हणाले की “या आधी फक्त संशोधनापुरते वापरण्यासाठी मर्यादित असलेले ऑप्ट्रास्कॅन आता एक परिपूर्ण साधन आहे, ज्याद्वारे संपूर्ण डिजिटल स्लाईड ईमेज संपादन करून ती स्क्रीनवर बघणे, शेयर करणे, ईमेज चे विश्लेषण करणे व व्यवस्थापन करणे अतिशय सोपे झाले आहे.”

या वेळी ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट डॉ.सुजित जोशी म्हणाले की  “ऑप्ट्रास्कॅन डिजिटल पॅथॉलॉजी प्लॅटफॉर्म व्हॅलीडेशन च्या प्रोजेक्टवर काम करणे हा खरोखर एक उत्तम अनुभव होता. ऑप्ट्रास्कॅन ची संपूर्ण तांत्रिक टीम या प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअर व हार्डवेअर परिक्षणासाठी खूप उत्साही आणि सक्रिय होती. ऑप्ट्रास्कॅन च्या इमेजेस प्रचलीत ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप इमेजेस च्या तुलनेत समाधानकारक आहेत. ऑप्ट्रास्कॅन हे लहान आकाराच्या प्रयोगशाळांसाठीही उपयुक्त ठरते. मी या संपूर्ण टीम ला शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की या तंत्रज्ञानामुळे सर्व वापरकर्त्यांना पारंपरिक पॅथॉलॉजीकडून डिजिटल पॅथॉलॉजीकडे संक्रमण करण्यास मदत होईल.”

तसेच याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या नवले हॉस्पिटल व महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. भाग्यश्री गोगटे म्हणाल्या कि “मी ऑप्ट्रास्कॅन उपकरण प्रत्यक्षात पाहिले आहे आणि संपूर्ण स्लाईड स्कॅन देखील प्रमाणित केले आहे व  परिणाम  अतिशय  उत्तम आहेत. त्यांचे तंत्रज्ञान आणि परवडण्या जोगे उत्पादन यावर मी फार प्रभावित आहे, जी निश्चितच आपल्या डिजिटल  पॅथॉलॉजिच्या  गरजांना सहज अनुकूल  करण्यासाठी  अतिशय फायदेशीर ठरेल”

ऑप्ट्रास्कॅन ने पॅथोलॉजिच्या समुदायात पारंपारिक माइक्रोस्कोप ते डिजिटल पॅथॉलॉजी पर्यंत सोपे आणि जलद परिवर्तन सक्षमरित्या करून नवीन क्रांती घडवून आणली आहे. तसेच विशेषतः कर्करोगाच्या  योग्य  विश्लेषणाने रुग्णाच्या देखरेखीमध्ये आणि उपचारांना प्रचंड मदत होऊन तेथील तज्ञांच्या अभ्यासासाठी वास्तविक वेळेमध्ये प्रतिमांचे संकलन करण्याची सोय केली आहे .

प्रत्येक वर्षी लाखो भारतीय कर्करोगाचे शिकार होतात आणि साधारणतः प्रतिदिवस १,३०० हून  अधिक भारतीय आजारामुळे मृत्यूमुखी पडतात. इंडियन कॉउंसिल   ऑफ मेडिकल रिसर्च द्वारा जाहिर केलेल्या कर्करोगाच्या संशोधनानुसार २०२० पर्यंत कर्करोग होण्याचे प्रमाण भारतात २५% नी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. सध्याच्या घडीला कर्करोग हे देशात मृत्यू होण्याच्या कारणांन पैकी मुख्य कारणांन पैकी एक झाले आहे.

या तंत्रज्ञानाला, कर्करोगाच्या संशोधनामधे तसेच उपचार केंद्रामध्ये, स्थापित मोठी रुग्णालये , संपूर्ण भारतातील निदान प्रयोगशाळा ,स्पोक मॉडेल आणि अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संस्था या मधून उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळाला आहे. ऑप्ट्रास्कॅनची वाटचाल हि व्यवसायिकीकरणासाठी चांगली व योग्य सुरुवात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

4 दिवसांत 1200+ उड्डाणे रद्द, लुट अन हालापेष्टांनी प्रवासी हैराण…

नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी केवळ व्यक्त केली नाराजी, म्हणाले-...

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये...