पुणे–नव्यानी व्यवसाय व व्यवसायात असलेल्या लोकांनी सोशल मिडियाच्या मध्यमातून आपला उद्योग कसा वाढवावा व त्यासाठी त्याचा नेमका उपयोग कसा करावा.हे मार्गदर्शन देण्यासाठी देआसरा फाउंडेशन ने हि कार्यशाळा मोरया सभागृह, पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती.देआसरा फाउंडेशन हे नवीन व्यावसायिकांना उद्योग सुरु करण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन प्रोत्साहन कायमच देत असते. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायातहीप्रगत होऊन,हे तांत्रिक बदल करणे आवश्यक आहे. यासाठी सोशल मिडिया चा वापर आपला उद्योग वाढवण्यासाठी कसा चांगल्या प्रकारे करू शकतो व जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कशा प्रकारे पोहचू शकतो.या बद्दल ची माहिती फाउंडेशनच्या मार्केटिंग प्रमुख, नेहा सरवाल यांनी नवीन व्यावसायिकांना दिली.यावेळी त्या म्हणाल्या की, “सोशल मिडिया चा माध्यमातून आपण घरी बसल्या हि उद्योग करू शकतो. त्यासाठी आपल्या आपल्या व्यवसायासाठी कोणते सोशल मिडिया स्थळ योग्य आहे हे आधी पहाणे आवश्यक आहे.” तसेच त्यांनी नक्की कोणती संकेतस्थळे वापरावी व त्याचा कसा उपयोग करावा याचीही माहिती त्यांनी सर्वान समोर मांडली. याबद्दल माहिती देताना त्यांनी आवर्जून सांगितले की, इतर शहर व देश-विदेशातील ग्राहक हा आपल्याला सोशल मिडिया व इतर संकेतस्थळांवरच उपलब्ध होणार आहे. याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल या कडे प्रत्येक उद्योजकाने नक्की लक्ष दिले पाहिजे व आपला व्यवसाय सर्वत्र पसरवला पाहिजे.