पुणे-कर्तव्य देशासाठी… एक पाऊल तुमच्या आरोग्यासाठी..असे म्हणत नगरसेविका सौ. अश्र्विनी नितीन कदम यांनी खरोखर एक पाऊल पुढे नेले आहे . आणि त्यांनी गरजूंसाठी कॉरोनाची तपासणी मोफत सुरु केली आहे असे राष्ट्रवादी च्या पर्वती मतदार संघाचे नितीन कदम यांनी कळविले आहे.
ते म्हणाले ,’सबअर्बन डायग्नोस्टिक्स प्रा.लि. (SUBURBAN DIAGNOSTICS PVT. LTD.)यांच्या माध्यमातून नागरिकांची कोरोना संबंधीत COVID-19 तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी श्री.जगदीश गुरव- 8087755889 यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपली व आपल्या कुटुंबाची आवश्यकतेनुसार तपासणी काळजीपूर्वक करून घ्यावी.ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष सेवेसाठी सबअर्बन डायग्नोस्टिक्सची यंत्रणा आपल्या घरी येऊन मोफत तपासणी करतील. ही तपासणी पुर्णपणे मोफत असून त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि आपले आधार-कार्ड आवश्यक आहे.

