एचपी ग्रुप संघाचा पहिला विजय; शिवानी के. व तेजल हसबनीस यांची 91 धावांची विजयी भागीदारी;
पुणे, 25 जानेवारी 2021: हेमंत पाटील ग्रुप यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एचपी ग्रुप व आर्या स्पोर्ट्स या संघानी अनुक्रमे वॉरियर्स स्पोर्ट्स व पुनीत बालन ग्रुप या संघांचा पराभव करून विजय नोंदविला.
व्हिजन क्रिकेट मैदान, सिंहगड रोड व डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत मैदानावर दव असल्याने पहिला सामना 18 षटकांचा खेळविण्यात आला. शिवानी के.(नाबाद 52धावा),च्या अर्धशतकी खेळीसह 23वर्षांखालील महाराष्ट्र संघांची कर्णधार असलेल्या तेजल हसबनीच्या उपयुक्त नाबाद 49 धावांच्या जोरावर एचपी ग्रुप संघाने वॉरियर्स स्पोर्ट्स संघाचा 9 गडी राखून पराभव केला.वॉरियर्स स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 18षटकात 5 गड्यांच्या बदल्यात 108धावाचे आव्हान उभे केले. यात खुशी मुल्ला हिने 31 चेंडूत 4चौकरांसह नाबाद 37 धावांची संयमपूर्ण खेळी केली. खुशीला सायली लोणकरने 25, साक्षी कानडीने 12, माया सोनावणेने 19 धावा करून सुरेख साथ देत 108 धावांचे आव्हान उभे करून दिले. एचपी ग्रुप कडून रसिका शिंदे(1-6), रोहिणी माने(1-16), प्रियांका घोडके(1-18), कश्मिरा शिंदे(1-17)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. याच्या उत्तरात हे आव्हान एचपी ग्रुप संघाने 11.2 षटकात 1बाद 109धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. सलामीची फलंदाज शिवानी के. हिने 43 चेंडूत 11 चौकरांच्या मदतीने नाबाद 52धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवानीला तेजल हसबनीसने 25 चेंडूत 7चौकार व 1 षटकांरांसह नाबाद 49 धावा काढून चांगली साथ दिली. शिवानी व तेजल या जोडीने 55 चेंडूत 91 धावांची भागीदारी करून संघाला सहज विजय मिळवून. सामन्याची मानकरी तेजल हसबनीस ठरली.
दुसऱ्या सामन्यात मोना मेश्राम(नाबाद 76) हिने केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर आर्या स्पोर्ट्स संघाने पुनीत बालन ग्रुप संघाचा 8 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:वॉरीयर्स स्पोर्ट्स: 18षटकात 5बाद 108धावा(खुशी मुल्ला नाबाद 37(31,4×4), सायली लोणकर 25(21,2×4), माया सोनावणे 19(29), साक्षी कानडी 12, रसिका शिंदे 1-6, रोहिणी माने 1-16, प्रियांका घोडके 1-18, कश्मिरा शिंदे 1-17) पराभूत.वि.एचपी ग्रुप: 11.2 षटकात 1बाद 109धावा(शिवानी के. नाबाद 52(43,11×4), तेजल हसबनीस नाबाद 49(25,7×1, 1×6), प्रियांका कुंभार 1-13);सामनावीर-तेजल हसबनीस; एचपी ग्रुप संघ 9 गडी राखून विजयी;
पुनीत बालन ग्रुप: 20षटकात 2बाद 117 धावा(शिल्पा साहू 61(71,7×4), आयुषी सोनी नाबाद 43(41,4×4), गौतमी नाईक 1-19, उत्कर्षा देशपांडे 1-33) वि.वि.आर्या स्पोर्ट्स: 16.2षटकात 2बाद 120धावा(मोना मेश्राम नाबाद 76(60,8×4,2×6), किरण नवगिरे नाबाद 22(20,3×4), साक्षी वाघमोडे 12, आयूशी सोनी 2-21);सामनावीर-मोना मेश्राम; आर्या स्पोर्ट्स 8 गडी राखून विजयी.

