कृत्रिम बुद्धिमत्ता आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक – ऍड. एस. के. जैन

Date:

पुणे : “वर्षानुवर्षे एकच पद्धती अस्तित्वात होती. शिक्षक ही एकाच पद्धतीने शिकवायचे. परंतू आता दररोज शिक्षण पद्धतीमध्ये बदल होतोय. नवीन शिक्षण पद्धती रुजवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. नवीन शिक्षण पद्धती आत्मसात करताना आपण आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतींकडे दुर्लक्ष करता कामा नये. कृत्रिम बुद्धिमत्ता आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. परंतु आपण हे औषध म्हणून वापरायला हवे त्याचे व्यसन लागता कामा नये. जगावर राज्य करायचे असल्यास आपल्या देशातील विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानामध्ये पारंगत व्हायला हवे” असे मत जेष्ठ विधिज्ञ आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन यांनी केले.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग’ शैक्षणिक अभ्यासक्रमात येऊ घातले आहे.  या तंत्रज्ञानाविषयी सखोल चर्चा करण्यासाठी बंगलोर येथील फुटोलर्न एज्युकेशन संस्थेतर्फे चर्चासत्राचे आयोजन केले होते. हॉटेल रामादा प्लाझा, हिंजवडी येथे हे चर्चासत्र पार पडले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन तसेच आर्किड स्कूलच्या संस्थापक संचालिका लक्ष्मी कुमार, एसएनबीपी स्कूलच्या प्राचार्या जयश्री वेंकटरमन, अलार्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका ज्योत्स्ना मिश्रा, एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या बिंदू सैनी, मिटकॉन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मोनिका छाब्रा चर्चासत्रामध्ये सहभागी झाल्या होत्या. 

सायबर सुरक्षा, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर होणार चांगला आणि वाईट परिणाम, शिक्षण क्षेत्रात आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये होत असलेले बदल या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच हे तंत्रज्ञान शिकवण्यासोबतच ते वापरण्याची नैतिक जबाबदारीही विद्यार्थ्यांना कळायला हवी असे मत शिक्षक मांडत होते. या चर्चासत्राचे संचालन करताना सेजल समर-जोधावत यांनी आणि त्यांच्या टीमने उपस्थित शिक्षकांच्या शंकेचे निरसरण केले. तसेच शिकवताना येणाऱ्या संभाव्य अडचणी, त्याचा वापर, भविष्यातील त्याचे महत्व अशा अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

 “सीबीएसई अभ्यासक्रम आणि शाळा यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी फुटोलर्न काम करत आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग’चे उत्तम मोड्यूल शाळांना पुरविणार आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला अतिशय महत्व असून, त्याचे विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान घेता यावे, यासाठी प्रयोगशाळा व प्रणाली पुरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात २० पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या फुटोलर्नने पुढाकार घेतला आहे. ‘सीबीएसई’ने अनिवार्य विषयांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाची जोड देण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाला फुटोलर्न साकार करणार आहे,” असे सेजल समर-जोधावत यांनी नमूद केले.  

“सध्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये याचा वापर होतोय आणि या तंत्रज्ञानाविषयी तरुणांना जागरूक करणे महत्वाचे आहे. सीबीएसईने याविषयीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. शालेय अभ्यासक्रमात याची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक असले तरी  फूटलर्नच्या माध्यमातून सहजपणे शाळा हे आत्मसात करू शकतात. या जटिल तंत्रज्ञानाविषयी मुलांसाठी अनुकूल सामग्री आम्ही तयार केली आहे. तसेच शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीही विविध कार्यक्रम या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणानंतर शिक्षक अगदी सहजरित्या विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान शिकवू शकतील,”असे ही त्या म्हणाल्या. 

फुटो लर्नच्या बेंगलोर येथील टीममधील कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ सविता मुरली यांनी ‘व्हर्च्युअली’ शिक्षकांना संबोधित केले आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली.   

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...