इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक तेल कंपन्यांना इथेनॉल खरेदीसाठीच्या यंत्रणेला मंजुरी- पुरवठ्यासाठी इथेनॉलच्या दरात सुधारणा

Date:

सरकार  इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी)  कार्यक्रम राबवत आहे तर तेल विपणन कंपन्या 10% पर्यंत इथेनॉल मिसळून पेट्रोलची विक्री करत आहेत. या कार्यक्रमाचा 1 एप्रिल 2019 पासून अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप वगळता संपूर्ण भारतभर  विस्तार करण्यात  आला आहे. पर्यायी आणि पर्यावरण स्नेही इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा यामागचा उद्देश आहे. या निर्णयामुळे आयातीमध्ये कपात होईल आणि  कृषी क्षेत्राला चालना मिळेलअसा सरकारचा दावा आहे.

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने  या इथेनॉल पुरवठा वर्ष, ईएसवाय 2022-23 दरम्यान, एक डिसेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या आगामी 2022-23 च्या साखर हंगामासाठी विविध ऊस आधारित कच्च्या मालापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या उच्च दराला मंजुरी दिली आहे  :

  1. सी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 46.66 रुपयांवरून प्रतिलीटर 49.41 रुपये वाढ करण्यात आली आहे,
  2. बी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 59.08 रुपयांवरून प्रतिलीटर 60.73 रुपये वाढ करण्यात आली आहे,
  3. ऊसाचा रस/ साखर/ काकवी यांच्यापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 63.45 रुपयांवरून प्रतिलीटर 65.61 रुपये वाढ करण्यात आली आहे.

त्याव्यतिरिक्त जीएसटी आणि वाहतूक आकार देय असेल.

सर्व डिस्टिलरींना या योजनेचा लाभ मिळवता येईल आणि त्यांच्यापैकी बऱ्याच कंपन्यांकडून ईबीपी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी इथेनॉलचा पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. इथेनॉल उत्पादकांना त्यांची भरपाई पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे इथेनॉल पुरवठादारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर पैसे देता येतील ज्यामुळे शेतकऱ्यांच्या  समस्या कमी होण्यासाठी मदत होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...