माफी मागा अन्यथा थोबाड लाल करू! राष्ट्रवादीला रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष म्हणणाऱ्या दरेकरांना रुपाली चाकणकर यांचा इशारा!

Date:

पुणे-राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत आहे. आपल्या पक्षातील महिलांची काय स्थिती असेल हे आपल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.दरम्यान दरेकरांच्या वक्तव्यामध्ये अश्लील अर्थ नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?
प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, गरीबाला, छोट्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं, सत्ता देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच देऊ शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबाकडे बघायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष, भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...