या कंपन्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन येथे सेंटर ऑफ रिसर्च एण्ड इन्टेलेक्च्युअल
आंत्रप्रेन्युअरशीप उभारणार
पुणे: अनसिस (ANSYS) व कमिन्स इंडिया फाऊंडेशनतर्फे उद्योग-केंद्रित कौशल्य व
संसाधनांना प्रोत्साहन देण्याकरिता सेंटर ऑफ रिसर्च एण्ड इन्टेलेक्च्युअल आंत्रप्रेन्युअरशीप
(सीईआरआयई)च्या माध्यमातून महिला-केंद्रित इंजिनीअरिंग संशोधन व सिम्युलेशनला चालना दिली जात
आहे. सीईआरआयईला कमिन्स व अनसिसचे अर्थसहाय्य लाभले आहे. भारतातील पुण्यामधील कमिन्स कॉलेज
ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन (सीसीईडब्ल्यू) येथील सीईआरआयई ही महिला इंजिनीअर्ससाठी संशोधन व
नाविन्यतेला चालना देणार्या भारतातील काही सुविधांपैकी एक आहे.
‘इन्टेलेक्च्युअल आंत्रप्रेन्युअरशीप’ हे शिक्षणाचे तत्त्व व दृष्टिकोन असून ते शैक्षणिक संस्थांकडे ‘नवप्रवर्तक’ व
‘बदलाचे स्रोत’ म्हणून पाहते. सीसीईडब्ल्यूमधील विद्यार्थी आणि शिक्षकवृंदामध्ये संशोधन व नाविन्यतेची
संस्कृती जोपासली जावी, हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. तसेच, महिला इंजिनीअर्सच्या विकासावर भर देण्यासह या
प्रांतामध्ये इंजिनीअरिंग संशोधन व सिम्युलेशनला चालना देण्यासाठी एक लक्षणीय उत्प्रेरक म्हणून कार्य
करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. शिक्षकांच्या कौशल्यांमध्ये वाढ आणि या क्षेत्रात आवश्यक असणार्या तांत्रिक
कौशल्यांचा विकास करत वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानांच्या जलद विकासाकरिता संबंधित उद्योग व जागतिक योगदान
प्राप्त करणे, अशा कार्यांचा यात समावेश आहे.
‘‘सीईआरआयई उद्योग-शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाला चालना देण्यासोबतच भारतातील कौशल्य विकास व
प्रतिभांना भेडसावणार्या आव्हानांवर लक्ष देईल,’’ असे अनसिसच्या साऊथ एशिया पॅसिफिक व मिडल इस्टचे
कंट्री मॅनेजर, रफिक सोमानी म्हणाले. ‘‘उद्योगकेंद्रीत संसाधनांसह उच्च कौशल्ये असलेल्या महिला
इंजिनीअर्सच्या गटाला सज्ज करण्यात अनसिसला अभिमान वाटतो. आम्ही सीईआरआयई विद्यार्थ्यांकडून
सिम्युलेशनमधील प्रगती आणि नाविन्यता पाहण्यास उत्सुक आहोत.’’
‘‘कामकाजाच्या ठिकाणी महिलांचे सक्षमीकरण करण्यात कमिन्स नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. आमच्या
महिला कर्मचार्यांनी संशोधन व तंत्रज्ञानामध्ये उत्तम योगदान दिलेले आम्ही पाहिले आहे. म्हणून, आम्हाला
अनसिससोबत सहयोग जोडताना आनंद होत आहे. आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक
संधी निर्माण करण्यास उत्सुक आहोत. यामुळे उच्च-कौशल्यपूर्ण महिला इंजिनीअर्सचा प्रतिभावान समूह व
उद्योग-केंद्रित संसाधनांची निर्मिती होईल,’’ असे कमिन्स इंडिया एबीओ येथील कार्यकारी संचालक आणि
इंजिनीअरिंग एण्ड चीफ टेक्निकल ऑफिसर, मार्क फिर्थ म्हणाले.
‘‘सीईआरआयई पदवीपूर्व व पदव्युत्तर पातळ्यांवरील संशोधनाला चालना देईल आणि दर्जेदार शिक्षण देणारी व
महिला इंजिनीअर्सची निर्मिती करणारी जागतिक दर्जाची संस्था हा आमच्या कॉलेजचा दृष्टिकोन संपादित
करण्यामध्ये आम्हाला सहाय्य करेल. आम्ही सीईआरआयई उभारण्याकरिता कमिन्स इंडिया फाऊंडेशन व
अनसिसचे आभार मानतो,’’ असे पुणे येथील सीसीइडब्ल्यूच्या संचालिका डॉ. माधुरी खाम्बेते म्हणाल्या.

