पुणे- डॉ . नरेंद्र दाभोलकर यांच्या तृतीय स्मृती प्रित्यर्थ अंधश्रद्धा निर्मुलन विषयावर लघुपट महोत्सव येत्या १२ आणि १३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि ‘आटपाट ‘ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला असून १५ मिनिटे कालावधीतील कोणत्याही भाषेतील लघुपट 5 ऑगस्ट पर्यंत साधना साप्ताहिक कार्यालय ४३१ शनिवार पेठ पुणे (संपर्क -9881691651/9422305929 ) येथे जमा करता येतील . 5 हजार पासून ते २५ हजार पर्यांची बक्षिसे विजेत्यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार असून विजेत्या लघुपटांचा प्रसार देशभर करण्याची अनिस ची योजना आहे अशी माहिती गार्गी कुलकर्णी आणि योगेश कुदळे यांनी दिली