Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेफ देवव्रत आनंद जातेगावकरांच्या मार्गारीन ‘त्रिमूर्ती’ शिल्पाची झाली ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

Date:

सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डॉमेस्टिक) विमानतळाच्या आवारात (अरायवलमध्ये) गेल्या महिन्याभरात पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शेफ देवव्रत आनंद जातेगावकर यांच्या मार्गारीन ‘त्रिमूर्ती’ शिल्पाची दखल आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. हे शिल्प वातानुकुलीत काचेच्या कॅबिनमध्ये करण्यात आले होते, आणि २४ फेब्रुवारी २०१७ (महाशिवरात्री)ला पूर्ण होऊन सर्वांसाठी एक महिना प्रदर्शनास ठेवण्यात आले होते.

मुंबईत येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट ठरलेल्या या त्रिमूर्तीची ख्याती जागतिक स्तरावर देखील पसरली आहे. तब्बल १५०६.८०० किलो वजनाचे हे शिल्प साडे आठ फुट लांबीचे व साडे सहा फूट उंचीचे होते. अवघ्या १० दिवसात या भव्य शिल्पाचे कामकाज शेफ देवव्रत जातेगावकर यांनी पूर्ण केले. त्यासाठी दिवसाचे १४ तास ते या काआर्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असायचे. या शिल्पाद्वारे भारतीय संस्कृतीची महती, जागतिक पातळीवर आणखीन वाढवण्याचा मानस शेफ देवव्रत जातेगावकर यांचा आहे.

मार्गारीन (लोण्याचा पदार्थ) हा पदार्थ तेलापासून बनवतात. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर बेकरी उत्पादकामधे केला जातो. फळे, भाज्या, चॉकलेट तसेच मार्गारीन,काआर्व्हिंगमध्ये शेफ देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले असून, मार्जरीन शिल्पकलेत शेफ देवव्रत यांनी सुवर्णपदकदेखील पटकावले आहे २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या कलिनरी ऑलिम्पिकमध्ये शेफ देवव्रत यांच्या ‘O सिंड्रेला’ या मार्गारीनच्या शिल्पाने भारताला पहिलवाहिले रौप्यपदक मिळवून दिले होते. सत्तर देशातील जवळ जवळ १८०० शेफ्सनी त्यात भाग घेतला होता. महाला सकट सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्गारीनमध्ये साकारली होती.

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपल्या कलेच्या माध्यमाने नाव नोंदवून या बहुगुणी अवलियाने भारताची कला महती आणखीन वाढवली आहे. या रेकॉर्ड संबंधी विचार व्यक्त करताना शेफ देवव्रत म्हणाले, ‘ हे शिल्प साकारणं हे गेल्या कित्येक वर्षांचं माझं स्वप्न होतं, माझे वडील आनंद विनायक जातेगावकर माझे स्फूर्तीस्थान आहेत, त्याच्या प्रेरणेनेच हे काम मी सुरु केले होते. शिल्प करताना अनेक अडचणी आणि प्रसंग माझ्यासमोर आले. कॅबिनचे तापमान आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला मूर्तीला तीन वेळा मोठ्या तडा गेल्या होत्या. तसेच शिल्प पूर्ण झाल्यानंतरसुद्धा ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’कडून कडीपाहणी करण्यात आली, आणि शेवटी स्वप्न साकार झाले. माझ्यासोबत माझी शेफ मंडळींची टीम रात्रंदिवस काम करत होती’.

शेफ देवव्रत जातेगावकर दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातून लोकांच्या घराघरात पोहोचले आहेत. रेसिपी व्यतिरीक्त त्यांचा काआर्व्हिंग हा पैलू विशेष लोकप्रिय आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज

वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय ह. भ. प. योगीराज...

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी...