बहारदार नृत्यरचनांच्या ‘सरीवर सर’

Date:

गुरू-शिष्य नात्याची ‘अनुबद्ध’ मैफल संपन्न
पुणे: गुरूकडून आत्मसात केलेले ज्ञान आचरणात आणताना शिष्याची खरी कसब लागते. या वाटेवर यशस्वी झालेला शिष्य आपल्या कलेच्या सादरीकरणातून साक्षात गुरुचेच दर्शन घडवतो. असाच काहीसा अनुभव काल रसिक प्रेक्षकांना आला. श्रावण सरींसह बरसणाऱ्या धृपद, तालरुद्र, दादरा, त्रिवट, दशावतार, छबी, होरी, समधुन,  कठपुटली यांसारख्या नावीन्यपूर्ण व बहारदार नृत्यसरींनी रसिकांना चिंब केले.
निमित्त होते नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे झालेल्या ‘अनुबद्ध’ कथक नृत्यमैफलीचे. संस्थेचा ७२ वा  वर्धापनदिन तसेच गुरुपौर्णिमा उत्सव असे दुहेरी औचित्य साधून ही मैफल घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे ही मैफल पार पडली. प्रथेनुसार, नृत्यभारतीच्या शिष्यांनी गुरु पं. रोहिणी भाटे यांना स्वरचित रचनांची नृत्यांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. शरदिनी गोळे यांच्या शिष्यांनी कल्पक शैलीतून ‘दुर्गा धृपद’ सादर करत कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. शंकराच्या तांडव व लास्य या दोन्हीचा सुंदर मिलाफ ‘ताल रुद्र’ यातून रसिकांनी अनुभवला.
प्राजक्ता राज यांनी आपल्या एकल प्रस्तुतीतून मिश्र खमाज रागातील ‘दादरा ‘ पेश केला.
‘तीर पर कैसे रुकूँ मैं, आज लहरों में निमंत्रण’ या नृत्यबद्ध केलेल्या कवितेसह ‘त्रिवट’ रचनेचे सादरीकरण अमला शेखर यांनी आपल्या शिष्यांसह केले. यास रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
गतिमान नृत्याचे बारकावे दाखवत प्रस्तुत झालेल्या ‘ दशावतार ‘ या नृत्याविष्कारास रसिकांची विशेष वाहवा मिळाली. नृत्यभारती परिवाराच्या ११ शाखेतील शिष्यांनी एकत्रितपणे ‘श्याम छबी ‘ ही नृत्यरचना सादर केली. प्राप्त ज्ञानाला सूक्ष्म अभ्यासाची व रियाजाची जोड असल्याचे नीलिमा अध्ये यांच्या शिष्यांनी केलेल्या सादरीकरणातून दिसून आले. तर नीलिमा अध्ये यांनी साकारलेल्या मीरा भजनातून नृत्य आणि अभिनय यांचे दर्शन घडले.
परंपरेनुसार, कार्यक्रमाच्या सांगतेला गुरु रोहिणीताई भाटे यांची ‘कठपुतली’ ही
संरचना सादर करण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य विषयीची भावना मांडणाऱ्या या विलोभनीय रचनेने रसिकांना अंतर्मुख केले. या अनोख्या नृत्याविष्काराला रसिकांनीही भरभरून दाद दिली. यावेळी आशाताई आपटे यांच्या नावे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीतही नृत्याचा ध्यास न सोडलेल्या मयुर शितोळे या शिष्यास ही शिष्यवृत्ती जाहीर झाली.
या कार्यक्रमास अजय पराड (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), अर्पिता वैशंपायन (गायन) आणि आदित्य देशमुख (तबला) यांनी समर्पक साथ दिली. सूत्रसंचालन मनीषा अभय यांनी केले.
‘होरी’  रचनांमधून नृत्यरंगांची उधळण
 ‘होरी’ हा रंगाचा सण नृत्यातून उलगडणाऱ्या वैविध्यपूर्ण रचना यावेळी कलामंचावर सादर झाल्या. अरुणा केळकर यांची एकल प्रस्तुती, आभा वांबुरकर यांच्या शिष्या आणि रोशन दाते यांची बैठकीची  ‘होरी’  या रचनांमधून नृत्यरंगांची अक्षरशः उधळण झाली. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा हजारो नागरीकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

पुणे-नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने...

कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजून निर्णय नाही:संजय राऊतांची सुप्रीम कोर्टावर नाराजी

मुंबई- शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही...

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन...