शंभूराजांच्या बलिदान स्मरणदिनाला अमोल कोल्हेंची उपस्थिती

Date:

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार धर्मवीर संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. या कामी अभिनेते डॅा. अमोल कोल्हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजीया मालिकेद्वारे ‘ऑनस्क्रीन’ संभाजी महाराज साकारतानाच पडद्यामागेही शंभूराजांचं जीवनचरित्र जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेल्या कोल्हे यांच्या उपस्थितीत संभाजी महाराजांचा ३२९ वा बलिदान स्मरणदिन तालुका शिरूर येथील श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथे साजरा करण्यात आला.

मृत्युंजय अमावस्या म्हणजेच फाल्गुन वद्य अमावस्या ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन म्हणून साजरी केली जाते. याप्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले,  सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, स्वराज्यरक्षक संभाजीया मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॅा. अमोल कोल्हे, शंतनू मोघे (शिवाजी महाराज), स्नेहलता वसईकर (सोयराबाई), पल्लवी वैद्य (पुतळाबाई), प्राजक्ता गायकवाड (यसूबाई), दिग्दर्शक विवेक देशपांडे, कार्तिक केंढे, निर्माते डॅा. घनश्याम राव, छायालेखक निर्मल जानी, क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे, कार्यकारी निर्माते समीर कवठेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या समाधीला महाअभिषेक करण्यात आला. पवित्र मंत्रोच्चारांच्या जयघोषात संभाजी महाराजांच्या समाधीवर हेलिकॅाप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मूक पदयात्रा काढण्यात आली. शिवकालीन पोवाड्यांनी दुमदुमलेल्या वढूमध्ये शंभूराजांच्या समाधीची पूजा करून शासकीय मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पुरंदर ते वढू बु. भव्य पालखी सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले. धर्मसभा व पुरस्कार वितरणही करण्यात आले.

धर्मासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांचा खरा इतिहास आजवर जगासमोर येऊ न शकल्याची खंत डॅा. अमोल कोल्हेंच्या मनात होती. स्वराज्यरक्षक संभाजीया मालिकेद्वारे आजतागायत अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण केलं जात असून त्यात आपला खारीचा वाटा असल्याने जीवन कृतार्थ झाल्याची भावना कोल्हे यांनी व्यक्त केली. पूर्वी नाटक आणि आता मालिकेच्या निमित्ताने शंभूराजांच्या जीवनचरित्राचा विविध अंगांनी अभ्यास करताना संभाजी महाराजांचं खरं दर्शन घडलं आणि त्यातून उलगडलेले संभाजीराजे आज स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये साकारत असल्याचेही कोल्हे म्हणाले. मृत्युंजय अमावस्येला असणारा संभाजी महाराजांचा बलिदानस्मरण दिन सोहळा अंगावर रोमांच आणणारा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात शंभूराजांनी दिलेल्या धर्मलढ्याची आठवण करून देणारा असल्याचं मतही कोल्हे यांनी व्यक्त केलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...