पुणे : आपला परिसर, प्रभाग व पर्यायाने शहर दररोज स्वच्छ ठेवणाऱ्या महिला कर्मचारी या स्वच्छता मोहिमेच्या ‘स्वच्छता दूत‘ आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अभियान साकारण्यासाठी त्या काम करीत आहेत. त्यांच्यामुळेच शहराचे आरोग्य व पर्यावरण चांगले राहात आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य बनते, असे मत शहर भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज व्यक्त केले.
प्रभाग व परिसर स्वच्छ करण्याचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते साडी वाटप करुन सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी
याप्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, नगरसेवक अमोल बालवडकर, औंध-बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, औंध-बाणेर क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम, राहुल बालवडकर, आत्माराम बालवडकर, शशिकांत बालवडकर, औंध बाणेर प्रभागातील महापालिका कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

