अमिताभ बच्चन यांची पत्रकारांशी दिलखुलास चर्चा
मुंबई-सबर्बन स्टुडीओ मध्ये वजीर या सिनेमासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांनी पत्रकारांशी खूपच मनमोकळा संवाद साधला …’दिग्दर्शक शंकर माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘रोबोट’मध्ये (2010) खलनायकाच्या भूमिकेत घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मी रजनीकांत ला फोन केला. पण त्याचे म्हणणे वेगळे होते , तो म्हणाला की लोक तुम्हाला खलनायकाच्या भूमिकेसाठी स्वीकारणार नाहीत. म्हणून करू नये . मी म्हणालो ‘ओके’.’ बातमी अशीही आली होती, की ‘रोबोट 2’मध्येसुध्दा अमिताभ असतील, त्याबाबत बोलताना ते म्हणाले आता मी नसेल त्यात .
अमिताभ बच्चन विजॉय नाम्बियारच्या ‘वजीर’ सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय, सुजॉय घोषच्या आणि ‘आंखे 2’मध्येसुध्दा ते दिसणार आहेत. ‘आंखे 2’चे शूटिंग मार्चमध्ये सुरु करणार आहेत.असे यावेळी अमिताभ बच्चन यांनी सांगितले
या पत्रकार परिषदेस अमिताभ बच्चनशिवाय फरहान अख्तर, आदिती राव हैदरी सिनेमाचे दिग्दर्शक विजॉय नाम्बियार आणि निर्माता विधु विनोद चोप्रासुध्दा उपस्थित होते.
वजीर च्या प्रमोशनसाठी अमिताभ … मिडिया सोबत

























