सीमावादात अमित शहांची मध्यस्थी:14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, खासदार अमोल कोल्हेंची माहिती

Date:

महाराष्ट्र-कर्नाटक वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भेटीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवर बोलणे झाले आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलून समन्वयाने या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली. अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला. ते 14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमाभागातील नागरिक 1956 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर अत्याचाराचा वरंवटा फिरवला जात आहे. आताही सीमाभागातील नागरिकांवर अत्याचार केला जात आहे. हे सर्व गृहमंत्री अमित शहा यांनी समजून घेतले आहे. ते लवकरच या वादावर तोडगा काढतील , असा विश्वास आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या अवमानजनक वक्तव्याबाबत संसदेत खासदार डॉ. अमोल कोल्हे मुद्दा मांडत असतानाच त्यांचा माईक बंद पडला. याबाबत आपण लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी बोलत असतानाच माईक बंद पडला व त्यानंतर लगेच सदन स्थगित करण्यात आले, हा प्रकार अख्ख्या देशाने पाहिला आहे. याबाबत मी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...