अमेरिकेतील टेक कंपनी ‘मॅंटिक इन्क’चे भारतात विस्ताराचे नियोजन

Date:

पुण्यातील कामकाजासाठी २५०हून अधिक तंत्रज्ञांची नियुक्ती करणार

कोलकातामध्ये ‘ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर’ उघडले

पुणे-मॅंटिक इन्क या अमेरिकेतील अग्रगण्य अशा ग्लोबल आयटी सोल्युशन्स कंपनीने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे नवीन अत्याधुनिक ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर (ओडीसीउघडून पूर्व भारतात आपल्या व्यावसायिक कामकाजाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. पुण्यानंतर ‘मॅंटिक’चे हे भारतातील दुसरे ऑफशोअर कार्यालय आहे.

मॅंटिकचे कोलकात्यातील कार्यालय सॉल्ट लेक सिटीसेक्टर ५टेक्नोपोलिस येथे सुरू झाले आहे. ‘मॅंटिक’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरी अय्यर, ‘मॅंटिक’चे कोलकात्यातील केंद्राचे प्रमुख व डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन विभागाचे जागतिक प्रमुख शिरसेंदू सेनगुप्ता, ‘पेगासिस्टम्स’चे ‘स्ट्रॅटेजिक अलायन्स’चे संचालक आनंद झा, ‘नाबादिगंता इंडस्ट्रियल टाउनशिप अथॉरिटी’चे (एनडीआयटीए) अध्यक्ष देबाशीष सेन आणि ‘ऑफर इंडिया’चे संस्थापक कल्लोल घोष यांच्या हस्ते नवीन केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले.

मॅंटिक ही अमेरिकेतील टेक क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठीचे कंपनीचे सर्वात मोठे ‘टॅलेंट हब’ कोलकात्यामध्ये बनवण्याची ती योजना आखत आहे. आयटी क्षेत्रातील या प्रमुख कंपनीने शहरात अगोदरपासूनच कर्मचारी भरती सुरू केली आहे, तसेच २०२३च्या अखेरपर्यंत ३०० जणांना कामावर घेण्याची योजनाही तयार केली आहे.

२०२३च्या अखेरपर्यंत पुण्यातील कार्यालयातदेखील सध्याची १२० तंत्रज्ञांची संख्या वाढवून ३७० पर्यंत नेण्याचे ‘मॅंटिक’ने ठरविले आहे.

आपल्या या वाढत्या ‘टॅलेंट पूल’मध्ये भर घालण्यासाठी कंपनीने कोलकाता येथे नवोदितांचे ‘कॅम्पस हायरिंग’ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर, प्रतिभावंत तज्ज्ञांना आकर्षित करण्यासाठी या कंपनीने, कोविडच्या साथीच्या वेळी कामाची जी पद्धत सुरू झाली, त्या ‘वर्क फ्रॉम होम’ला महत्त्व देत त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘वर्क फ्रॉम होम रिजन’ यासाठी अनेक तंत्रज्ञ प्राधान्य देत असल्याने त्यांना आकर्षित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

कोलकाता येथील नवीन ऑफशोअर कार्यालयाविषयी बोलताना मॅंटिक इन्कचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरी अय्यर म्हणाले, “पुण्यानंतर कोलकाता येथे आमचे दुसरे भारतीय ऑफशोअर केंद्र उघडताना आम्हाला आनंद होत आहे. ‘द सिटी ऑफ जॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकातामध्ये भरपूर तांत्रिक प्रतिभा, उत्कृष्ट कार्यसंस्कृती आहे आणि जागतिक स्तरावर किफायतशीरपणाच्या निर्देशांकातही हे शहर उच्च स्थानावर आहे. हे निकष लक्षात घेता, आम्हाला विश्वास आहे की कोलकाता लवकरच जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठीचे आमचे सर्वात मोठे ‘टॅलेंट हब’ होईल. ‘मॅंटिक इन्क’ ही उत्तर अमेरिका, कॅनडा आणि भारत यांसारख्या जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फॉर्च्युन १० आणि फॉर्च्युन ५०० कंपन्यांसोबत काम करणाऱ्या, सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. आम्ही मध्य-पूर्व

मॅंटिकचे कोलकात्यातील केंद्राचे प्रमुख व डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन विभागाचे जागतिक प्रमुख शिरसेंदू सेनगुप्ता म्हणाले, “भारतीय आयटी क्षेत्रात पूर्वेकडील भागातील काम करणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या प्रदेशातील उपलब्ध प्रतिभावंताचा उपयोग करून घेणे, हे कोलकाता येथे नवीन कार्यालय स्थापन करण्याचे आमचे प्राथमिक कारण आहे. आम्ही सुरुवातीला आमच्या कोलकाता केंद्रातून डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन (बीपीएम, आरपीए) आणि क्लाउड सर्व्हिसेस, सीआरएम यांबाबतची पूर्तता करू आणि पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने इतर पद्धती सुरू करू.”

एनडीआयटीएचे अध्यक्ष देबाशीष सेन म्हणाले, “पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने आम्ही ‘मॅंटिक’चे कोलकात्यामध्ये स्वागत करतो. ‘मॅंटिक’चा येथे आणखी विस्तार करण्यासाठी आमच्याकडून आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ. पूर्व-पश्चिम मेट्रोच्या विस्तारामुळे सेक्टर ५च्या कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहेच, आम्ही या भागातील पायाभूत सुविधांमध्ये आमखीही सुधारणा सातत्याने करीत आहोत. ‘बंगाल आयटी सिलिकॉन व्हॅली हब’मध्ये आमच्याकडे आधीपासूनच टीसीएस, रिलायन्स आणि अदानी यांसारख्या कंपन्या येत आहेत. कोविड साथीच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता उज्ज्वल भवितव्य दिसू लागले आहे.”

मॅंटिक इन्क ही एक जागतिक प्रणाली एकत्रीकरण या क्षेत्रातील कंपनी आणि डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन (डीपीए) यांमध्ये तज्ज्ञ असलेली सल्लागार फर्म आहे. ‘डीपीए’मध्ये बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) व रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए), कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (सीआरएम) या गोष्टींचा समावेश होतो. ही कंपनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि अॅप्लिकेशन मॉडर्नायझेशनमध्ये अन्य कंपन्यांना मदत करते.

या कंपनीमध्ये सध्या जागतिक स्तरावर ५००हून अधिक आयटी तज्ज्ञ काम करतात. कॅलिफोर्निया येथे स्थित असलेली ही ग्लोबल आयटी सोल्युशन्स कंपनी अमेरिकेतील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. ‘मॅंटिक’ने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १२ टक्के वार्षिक वाढ नोंदवली होती. वाढती मागणी आणि वेगाने वाढणारे डिजिटल अवलंबन यांच्या पार्श्वभूमीवर, या आयटी फर्मला २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये आपल्या व्यवसायाची वाढ दुप्पट, म्हणजे २० ते २२ टक्के इतकी होण्याची अपेक्षा आहे. मॅंटिक इन्क. कंपनीने २०२३ च्या अखेरीपर्यंत जागतिक स्तरावरील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या १०००ने वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...