‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ मध्ये नोकरी मेळाव्यात 4 हजार युवकांचा सहभाग
पुणे :
शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ महाविद्यालयामध्ये शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी मेळ्यामध्ये पुणे जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातील 4 हजार होतकरू उमेदवार सहभागी झाले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नोकरी मेळाव्याचे नियोजन आणि आयोजन ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ चे संचालक डॉ. प्रा. आर. गणेसन यांनी केले होते.
मेळाव्यामध्ये 49 कंपन्यांनी उमेदवारांच्या विविध स्तर व स्त्रोत याकरिता मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांना योग्य कंपनीमध्ये रूजू होण्याकरिता प्राध्यापकांनी स्वयंस्फूर्तीने उमेदवारांना मार्गदर्शन केले.
युवकांनी अर्ज कसा करावा, मुलाखतीची पूर्वतयारी इत्यादीबाबत ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’च्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.