पुणे – ‘लीड मिडिया’ च्या वतीने आणि अखिल सदाशिव, शनिवार, नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती व वंदेमातरम संघटना यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दि. १४ एप्रिल रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये कलाकार, साहित्यिक, उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक आणि माध्यम प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी एकत्र येऊन वाचन महायज्ञ करणार आहेत.
सहभाग – विनोद सातव, अभिनेता- दिग्दर्शक प्रवीण तरडे, अॅड. असीम सरोदे, वैभव जोशी, विश्वंभर चौधरी, मेघराज राजेभोसले, सुरेश देशमुख, सचिन इटकर, सुनील अभ्यंकर, अश्विनी दरेकर, मृण्मयी देशपांडे, पौर्णिमा गानू, अॅड. रमेश परदेशी, केदार वांजपे, शैलेंद्र नांदुरकर, दीपक रेगे, मकरंद टिल्लू, वैभव वाघ, सचिन जामगे, अनघा फाटक, वंदे मातरम् संघटना, अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा पुणे, सेवादल परिवार, एकपात्री कलाकार परिषद, रसिक साहित्य.
वाचन महायज्ञ
दिनांक – १४ एप्रिल २०१८
वेळ – सायंकाळी ४.३० ते ६.३०
ठिकाण – सुशील बंगला, हॉटेल कोरोनेट शेजारी, संतोष बेकरी समोर आपटे रोड, पुणे.

